शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कुणाला जिलेबी तर कुणाला लागले ढोकळा खाण्याचे डोहाळे! बॉलीवूड अभिनेत्री सांगतात, गरोदरपणात काय खावेसे वाटले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2024 10:42 IST

1 / 10
गरोदरपणात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही महिलांना काहीच खाण्याची इच्छा होत नाही. तर, काही महिलांना विशिष्ट पदार्थ खाण्याचे डोहाळे लागतात. काही महिलांना उलटी आणि मळमळचा त्रास होतो. तर काहींना विशिष्ट वासाची समस्या असते(8 B-Town Mommies And Their Pregnancy Cravings).
2 / 10
गर्भधारणेदरम्यान अन्नाची लालसा सामान्य असते. डोहाळे लागल्यावर आपल्याला एकच पदार्थ खाण्याची इच्छा जास्त प्रमाणात होते.
3 / 10
तुमच्याप्रमाणेच, काही बॉलिवूड सेलिब्रिटींनाही त्यांच्या गरोदरपणात एका विशिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा झाली होती. कोणाला पिझ्झा, जिलेबी तर कोणाला ढोकळा खाण्याची इच्छा प्रचंड प्रमाणात झाली. कोणत्या अभिनेत्रीला कोणता पदार्थ खाण्याचे डोहाळे लागले होते? पाहा.
4 / 10
८ सप्टेंबरला दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई-वडील झाले. त्यांना कन्यारत्न प्राप्त झाली. रणवीरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा तिला पिझ्झा खाण्याची खूप इच्छा होत होती.
5 / 10
अनुष्का शर्मा काही महिन्यांपासून तिच्या दोन मुलांसह लंडनमध्ये राहत आहे. अनुष्का गरोदर असताना तिलाही अनेक पदार्थ खाण्याचे डोहाळे लागले होते. मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या गरोदरपणात तिला गोड पदार्थ खाण्याचे डोहाळे लागले होते. अनुष्का हलवा, पुरी, चणे खात असे. ती पिझ्झा आणि पाणीपुरीही खायची.
6 / 10
आलियाला एक सुंदर मुलगी आहे. राहा कपूर असे तिचे नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा ती गरोदर होती तेव्हा तिला पिझ्झा आणि गोड पदार्थ खाण्याचे डोहाळे लागले होते.
7 / 10
सोनम कपूर चित्रपटसृष्टीतील एक अतिशय स्टायलिश अभिनेत्री आहे. तिने सध्या सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला असून, ती सध्या मुलाकडे लक्ष देत आहे. तिला एक मुलगा असून, त्याचे वायु आहे. गरोदरपणात तिला गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली होती. त्या वेळेस तिने भरपूर चॉकलेट आणि केक खाल्ले होते.
8 / 10
बेबो म्हणजेच करीना कपूर दोन मुलांची आई आहे. गरोदरपणात करीना खूप सक्रिय होती. ती व्यायामही करायची. गरोदरपणात तिला कारली खाण्याचे डोहाळे लागले होते. याव्यतिरिक्त ती पास्ता, पिझ्झा, चॉकलेट, केकही खायची.
9 / 10
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवरला एक मुलगी आहे, तिचे नाव त्यांनी देवी ठेवले आहे. रिपोर्ट्सनुसार, बिपाशाला जलेबी खाण्याचे डोहाळे लागले होते.
10 / 10
ऐश्वर्या रायने २०११ साली मुलगी आराध्याला जन्म दिला. तिला गरोदरपणात ढोकळा आणि चिंचेचे लोणचे खाण्याचे डोहाळे लागले होते.
टॅग्स :bollywoodबॉलिवूडpregnant womanगर्भवती महिलाSocial Mediaसोशल मीडिया