शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नारळ फोडलं की शेंड्या आणि करवंटी फेकून देता? ७ भन्नाट वापर, केस काळे करण्यापासून झाडांसाठी खत करण्यापर्यंत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2023 4:04 PM

1 / 8
नारळाचा वापर स्वयंपाकात केला जातोच. याशिवाय नारळाची वडी, नारळाचे लाडू, नारळ भात असे विविध पदार्थ बनवले जातात. नारळ पाणी तर आपण उन्हाळ्यात पितोच. नारळ म्हणजे कल्पवृक्षच. मात्र नारळ फोडल्यावर तुम्ही करवंट्या आणि शेंड्या फेकून देता का? ७ आयडिया पाहा, आणि करा करवंटी आणि शेंड्यांचाही भन्नाट वापर(7 Genius Uses For Coconut Shells).
2 / 8
कॉकपीट म्हणजे नारळाचा भुसा झाडे लावताना वापरतात. कॉकपीट तयार करण्यासाठी नारळाची साल भांडंभर पाण्यात १५ दिवस बुडवून ठेवा. पंधरा दिवसानंतर काढून बारीक करा. त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या. आणि त्याचा वापर करा.
3 / 8
केसांसाठी काळ्या रंगाचा हेअर कलर म्हणून नारळाच्या सालीचा वापर करता येतो. त्याकरता नाराळाची साल लोखंडाच्या कढईमध्ये गरम करा. त्यानंतर साल जाळा. जळालेल्या सालींची पावडर तयार करा. या पावडरमध्ये नारळाचं तेल, राईचं तेल एकत्र करून केसांना लावा.
4 / 8
भांडी घासण्यासाठी नारळाच्या शेंडीचा वापर करता येईल. घराघरांमध्ये अशाप्रकारे स्क्रबर वापरण्याची पद्धत होती. अजूनही गावी याचा वापर काळपट भांडी घासण्यासाठी होतो.
5 / 8
नारळाच्या शेंडीने काहीजण दातही घासतात.
6 / 8
नारळाच्या मोठ्या करवंटीचा विविध वस्तूही बनवल्या जातात.
7 / 8
पाय मुरगळला तर सूज कमी करण्यासाठी नारळाच्या शेंडीची पावडरही लावतात.
8 / 8
उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी देण्यासाठी तुम्ही ते बाहेरही टांगू शकता.
टॅग्स :SocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया