शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जुन्या भरजरी साड्यांचे लेकीसाठी शिवा ड्रेस- लहान मुलींच्या ड्रेसचे ७ सुंदर पॅटर्न-दिवाळीत मायेची भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2024 19:16 IST

1 / 8
बऱ्याचदा असं हाेतं की घरातल्या जुन्या भरजरी, महागड्या साड्या आपण काही वारंवार नेसत नाही आणि त्या कुणाला देऊन टाकाव्या असंही आपल्याला वाटत नाही. म्हणूनच त्या साड्यांचा आता तुमच्या लेकीसाठी वापर करा. दिवाळीत घरातल्या साड्यांपैकीच एखादी साडी निवडा आणि त्याचे तुमच्या मुलींसाठी किती वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर ड्रेस शिवता येतील ते पाहा..
2 / 8
एखादी पारंपरिक पद्धतीची काठपदर असणारी साडी तुमच्याकडे असेलच. त्या साडीचा वापर करून बघा हा किती आकर्षक पद्धतीचा ड्रेस शिवता येतो.. सणावाराला, लग्नकार्यात असा ड्रेस मुलींना शोभूनच दिसतो. (photo credit- google)
3 / 8
इरकल, खण किंवा कॉटन साड्या असतील तर त्यांच्यापासून असे थोडे मॉडर्न लूक देणारे वन पीस शिवता येतील. (photo credit- google)
4 / 8
सध्या आलिया कट, नायरा कट अशा पद्धतीचे कुर्ते खूप ट्रेंडिंग आहेत. सिल्क किंवा शिफॉनची साडी असल्यास तुम्ही त्यापासून असा ड्रेस तयार करू शकता.
5 / 8
जुनी साडी वापरून या पद्धतीचा फ्रॉक तुम्हाला पाहिजे त्या लांबीचा शिवून घेऊ शकता. त्यावरचं हे जॅकेट शिवण्यासाठी एखादी दुसरी साडीही वापरता येईल. आई आणि मुलगी दोघीही असं सेम मॅचिंग करू शकता.
6 / 8
एखादी डिझायनर साडी असेल तर तिच्यापासून असा वेस्टर्न लूक देणारा ड्रेस तयार करता येईल.
7 / 8
असं लांब ब्लाऊज आणि त्याखाली घेरदार स्कर्ट हा पॅटर्नही मुलींना खूप शोभून दिसतो.
8 / 8
परकर पोलक्याचाच हा पॅटर्न किती माॅडर्न टच देऊन शिवला आहे ते बघा.. असा एखादा ड्रेस तुमच्या लेकीच्या वॉर्डरोबमध्ये असायला हरकत नाही.
टॅग्स :fashionफॅशनsaree drapingसाडी नेसणेkidsलहान मुलंStyling Tipsस्टायलिंग टिप्सDiwaliदिवाळी 2024