शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

शून्य खर्चात थंडीत तुमच्या चेहऱ्यावर येईल तेज, जुनाट त्वचाविकारही होतील बरे, करा फक्त ६ सोप्या गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2025 18:25 IST

1 / 8
हिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते. त्यामुळे मग त्वचा काळवंडून जाते आणि अगदी डल दिसू लागते.
2 / 8
असं होऊ नये म्हणून काही साध्या सोप्या गोष्टी घरच्याघरी करून पाहा. यामुळे त्वचा छान मॉईश्चराईज राहील आणि त्वचेवरचा ग्लो टिकून राहण्यास मदत होईल.
3 / 8
अर्धा चमचा ताजी साय घेऊन रात्री झोपण्यापुर्वी त्याने चेहऱ्याला, अंगाला मालिश करा. सकाळी चेहरा धुवून टाका. सायीमुळे त्वचा अगदी मऊ होते.
4 / 8
कानाला आणि कानाच्या आजुबाजुच्या भागाला मसाज करा. त्या भागात अनेक ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात. त्यांना मसाज केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
5 / 8
रोज १ चमचा तूप खा. तसंच रात्री झोपण्यापुर्वी थोडंसं तूप घेऊन पायाच्या तळव्यांना मसाज करा. त्याचाही खूप चांगला परिणाम त्वचेवर दिसून येतो.
6 / 8
घरचं अन्न खा. या हंगामात येणारी ताजी फळं खा. सकस, पौष्टिक आहार घेतल्याने पचन चांगले होते. शरीराला अनेक व्हिटॅमिन्स, खनिजे आणि ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात. त्याचाही परिणाम त्वचेवर दिसून येतो.
7 / 8
रात्री झोपण्यापुर्वी चांदीच्या ग्लासमध्ये पाणी भरून ठेवा आणि दुसऱ्यादिवशी सकाळी ते प्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीर डिटॉक्स होते. पचन क्रिया चांगली होते. याचा परिणाम आपोआपच त्वचेवर दिसून येतो. पिंपल्स, ॲक्ने कमी होतात.
8 / 8
माॅईश्चरायजर लावताना चेहऱ्याला मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरची सूज कमी होते. चेहरा टवटवीत दिसतो. त्वचेखालच्या भागात रक्ताभिसरण चांगले झाल्याने त्वचेवर चमक येते.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडी