1 / 7चुकीची आहारपद्धती, व्यायामाचा अभाव यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्राॅलचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे सध्या कमी वयात हृदयरोग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पंचविशी, तिशीतल्या तरुण मंडळींना हार्ट अटॅक आल्याच्या कित्येक घटना आपण ऐकतो. 2 / 7म्हणूनच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करायचे असेल तर कोणत्या हिरव्या भाज्या उपयोगी ठरतात, याविषयी रिसर्च गेटने दिलेली माहिती झीन्यूजने प्रकाशित केली आहे.3 / 7यापैकी पहिले आहे शेवग्याचा पाला किंवा पाने. या पानांमध्ये असणारे गुणधर्म रक्तवाहिन्या स्वच्छ करून शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यात मदत करतात.4 / 7तुळशीमध्ये असणारे ॲण्टीइन्फ्लामेट्री आणि ॲण्टी ऑक्सिडंट्स LDL म्हणजेच बॅड काेलेस्ट्रॉल कमी करतात. 5 / 7शरीरातील LDL ची पातळी कमी करण्यासाठी कडुलिंबाची पानंही खूप उपयोगी ठरतात असं त्या रिसर्चमध्ये सांगितलं आहे. 6 / 7कडिपत्तादेखील अतिशय उपयुक्त असून तो रोजच्या आहारात नियमितपणे असावा, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. 7 / 7मेथीच्या पानांमधले फायबर आणि इतर पौष्टिक घटक बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात.