शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

घरी झटपट करता येतील असे ५ चाट प्रकार, मुलांच्या उन्हाळी सुट्टीसाठी खास बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2025 15:41 IST

1 / 8
चाट हा प्रकरात आवडत नाही आसा नेमकाच कोणी असेल. तिखट, गोड, आंबट विविध चवींचे मिश्रण म्हणजे चाटचे प्रकार. मऊ तसेच कुरकुरीत पदार्थ एकाच वेळी एकाच खाद्यपदार्थांमध्ये खायचा आनंद चाट खाताना मिळतो.
2 / 8
पाणीपुरी तसेच शेवपुरी हे चाटचे प्रकार आपण आवडीने खातो. मात्र चाटमध्ये असे ही काही पदार्थ आहेत जे घरी करायला अगदीच सोपे आहेत. झटपट होतात आणि चवीला पण मस्त लागतात.
3 / 8
पापडी चाट हा प्रकार तसा फार लोकप्रिय आहे. कुरकुरीत पापडीवर दही, उकडलेले चणे, बटाटा विविध भाज्या चटणी घालून हा पदार्थ केला जातो. दही छान घट्ट आणि गोड असले तरच हा पदार्थ खाण्यात मज्जा आहे.
4 / 8
कॉर्न चाट हा पदार्थ डाएट करणार्‍यांसाठीही चांगला आहे. उकडलेल्या मक्याच्या दाण्यांचे हे चाट विविध भाज्या शेव वापरुन केले जाते. मस्त चाट मसाला वापरायचा. चीज ही घालू शकता.
5 / 8
तळून काढलेल्या बटाट्याचे आलू चाट दिल्ली सारख्या शहरांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. चवीला अगदी मस्त लागते. तसेच करायला फार सोपे आहे.
6 / 8
चनाचुर हा प्रकार कधी खाल्ला आहे का? चण्याच्या लहान पापडीचे हे चाट फारच कमाल लागते. लिंबाचा रस बारीक चिरलेला कांदा मे महिन्यामध्ये त्यामध्ये कैरी वापरली जाते. चवीला मस्त लागते.
7 / 8
वजन कमी करण्यासाठी डाएटवर आहात आणि चाट खायचे मन झाल्यावर हा पदार्थ खा. स्प्राऊट चाटमध्ये अनेक कडधान्ये असतात.
8 / 8
पाणीपुरीवाल्याकडे आणखी एक पदार्थ दिसतो. तो म्हणजे रगडा पॅटीस चवी फारच मस्त लागते. लोकांनाही फार आवडणारा पदार्थ आहे
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीkitchen tipsकिचन टिप्सCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.