1 / 7महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत आहे. एवढंच नाही तर या आजारामुळे मृत्यू होणाऱ्या महिलांचं प्रमाणही खूप जास्त आहे. कारण या आजाराची लक्षणं सहजासहजी जाणवत नाहीत (5 signs of cervical cancer you never ignore). किंवा जाणवले तरी त्यात महिलांना काही वेगळे वाटत नसल्याने त्या दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजार चटकन लक्षात येत नाही.(how to identify cervical cancer symptoms?)2 / 7म्हणूनच सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखून सावध व्हायला हवं. ही लक्षणं नेमकी कोणती याविषयी Cervical Cancer Prevention Week आणि Oxford Online Pharmacy यांनी दिलेली माहिती SurreyLive या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. ती लक्षणं कोणती ते पाहूया..3 / 7मासिक पाळी नसताना अचानकच केव्हाही ब्लिडिंग होणे.. असं वारंवार होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.4 / 7शारिरीक संबंधादरम्यान किंवा त्यानंतरही खूप त्रास होणे. पोट दुखणे, जळजळ होणे.5 / 7व्हजायनल डिस्चार्ज खूप जास्त प्रमाणात होणे तसेच त्याला खूप दुर्गंधी असणे किंवा त्यातूनही रक्तस्त्राव होणे.6 / 7सर्व्हायकल कॅन्सरचा परिणाम किडन्यांवरही होतो. त्यामुळे हातापायांवर सूज येणे, लघवीच्यावेळी त्रास होणे असाही त्रास या रुग्णांना होऊ शकतो.7 / 7अचानक खूप वजन कमी होणे, सतत थकवा येणे ही लक्षणंही सामान्य नाहीत. अशी लक्षणं वारंवार दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.