म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 7अपचन, ॲसिडीटी, गॅसेस होणे, पोट गच्चं होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे असे त्रास अनेक जणांना नेहमीच होत असतात. त्यासाठी आपण करतो त्याच काही चुका कारणीभूत आहेत.(5 mistakes that causes indigestion issue)2 / 7याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी gunjanshouts या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली असून अपचनाशी संबंधित त्रास टाळायचे असतील तर जेवण झाल्यानंतर ५ चुका टाळायलाच पाहिजेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.(5 things to avoid after meal)3 / 7त्यापैकी पहिली गाेष्ट म्हणजे जेवण झाल्यानंतर लगेचच चहा किंवा काॅफी घेणे. यामुळे आहारातील पौष्टिक घटक रक्तामध्ये व्यवस्थित शोषून घेतले जात नाहीत. त्यामुळे पोषण मिळत नाही. 4 / 7जेवण झाल्यानंतर लगेचच झोपणे. यामुळे ॲसिडीटी, पोट फुगणे असे त्रास होऊ शकतात.5 / 7जेवण झाल्यानंतर अनेक जणांना फळं खाण्याची सवय असते. ती देखील अतिशय चुकीची आहे. कारण जेवणानंतर लगेच फळं खाल्ल्यामुळे गॅसेस होतात.6 / 7जेवण झाल्यानंतर लगेचच आंघोळ केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह बिघडतो आणि त्यामुळे अपचनासारखे त्रास होतात. 7 / 7जेवण झाल्यानंतर लगेचच ब्रश करू नये. कारण असं केल्यामुळे दातांवरचा एनॅमल कमी होऊ शकतो.