भिंतींवर सतत पाली फिरतात? १ चमचा मिठाचा १ उपाय, पेस्ट कंट्रोल न करता पाली गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:10 IST
1 / 7आपलं घर (Home Hacks) स्वच्छ, नीटनेटकं साफ दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. (How To Get Rid Of Lizards) कायम घरात प्रवेश करतात आणि घर अस्वच्छता पसरवतात यामुळे घरात रोगही पसरू शकतात पाल पाहिल्यानंतर किळसही येते. पालींना दूर घालवण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया. (How To Remove Lizards From House)2 / 7 मीठ आणि पाण्याचे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. हे मिश्रण पालींवर फवारल्यास पाली पळून जाण्यास मदत होईल. त्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये मीठ आणि पाणी एकत्र करून या पाण्यानं भिंतींवर स्प्रे करा3 / 7पालींवर थंड पाण्याचा मारा केल्यानं त्यांची हालचाल मंदावते आणि त्या घराबाहेर पडतात. यासाठी तुम्ही पालींवर थंड पाण्याचा मारा करू शकता.4 / 7काळी मिरीची पावडर पाण्यात मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा त्यानंतर पालींवर किंवा त्याच्या वाटेवर फवारा. या उपायामुळे पाली दूर होण्यास मदत होईल.5 / 7पपईच्या पानांचा वास पालींना जराही सहन होत नाही. पपईची पानं घरात ठेवून तुम्ही पालींना दूर पळवू शकता.6 / 7लसणाप्रमाणेच कांद्याचाही वास एकदम उग्र असतो. जो पालींना अजिबात सहन होत नाही. कांद्याचा रस भिंतींवर फवारल्यास पाली दूर पळण्यास मदत होईल.7 / 7पालींना घरात अन्नपाणी मिळते म्हणून घरात उघड्यावर अन्नपदार्थ ठेवू नका. बेसिन सिंकजवळ ओलावा राहणार नाही याची काळजी घ्या. घरातील कोपरे आणि जाळी नियमित स्वच्छ करा. पाली डास, किटक खाण्यासाठी घरात येतात पण जर हे किटक कमी झाले तर आपोआप पाली येणं बंद होईल.