काय आहे किन्नर आखाडा, कधी झाली होती स्थापना, जाणून घ्या इतिहास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:17 IST
1 / 5प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात अभिनेत्री ममता कुलकर्णीने किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर उपाधी घेतली.2 / 5ममता कुलकर्णी ममता नंद गिरी असे नाव देण्यात आले. पण, ममता कुलकर्णीने ज्या आखाड्याची दीक्षा घेतली, त्याची सुरूवात कधी झाली.3 / 5किन्नर आखाड्याची स्थापना १३ ऑक्टोबर २०१५ रोजी झाली होती. उज्जैनमध्ये स्थापना झाल्यानंतर २०१६ मध्ये उज्जैनमध्ये आयोजित कुंभमेळ्यात हा आखाडा सहभागी झाला होता.4 / 5प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली हा आखाडा सामील झाला.5 / 5किन्नर आखाड्याचा धर्म ध्वज पांढर्या रंगाचा आहे. जुन्या आखाड्यासोबत झालेल्या करारानुसार किन्नर आखाड्याचा धर्म ध्वज जुन्या आखाड्यासोबतच फडकावला जातो.