शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips Calendar: तुमच्या घरातील कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे? या तीन गोष्टींकडे नक्की लक्ष द्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 11:39 IST

1 / 7
नवीन वर्ष सुरु झाले आहे, अनेकांनी त्यांच्या घरी कॅलेंडर बदलली असतील. जुने कॅलेंडर मागे ठेवून नवीन कॅलेंडर वर ठेवले जाते. मात्र, कॅलेंडर लावण्याची दिशा चुकली असेल तर नवीन वर्ष देखील फायद्याचे राहत नाही. याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. जर कॅलेंडर योग्य दिशेने लावले तर प्रगती योग्य दिशेने होत राहते. काही ज्योतिषाचार्यांनुसार घरातील जुने कॅलेंडर हटविणे आवश्यक आहे.
2 / 7
ज्योतिषाचार्य डॉ. अरविंद मिश्र यांच्यानुसार अनेक लोक जुने कॅलेंडर काढत नाहीत. वास्तूशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे चांगली गोष्ट नाही. यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टींमध्ये घट होऊ लागते. नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही. यामुळे जुने कॅलेंडर हटविणे गरजेचे आहे.
3 / 7
पश्चिम किंवा पूर्वेकडील भिंतीवर कॅलेंडर लावणे योग्य असते. अनेकदा कॅलेंडरच्या पानांवर हिंसक प्राणी, दु:खी चेहऱ्यांचे फोटो असतात. अशा प्रकारचे फोटो घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो.
4 / 7
जर घराच्या पूर्व दिशेला कॅलेंडर लावले तर ही दिशा खूप शुभ मानली जाते. कारण या दिशेचा स्वामी सुर्य देव आहे. जर कॅलेंडर उगवत्या सूर्याच्या फोटोचे असेल तर खूप शुभ मानले जाते.
5 / 7
घरात कॅलेंडर लावताना ते कधीही दक्षिण दिशेला लावण्यात येऊ नये. वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशेला कॅलेंडर लावल्याने सुख-समृद्धी आणि संपत्तीमध्ये कमी येते.
6 / 7
जर तुमच्या घरात कॅलेंडर असेल तर त्यावर कोणत्याही प्राण्याचा उदास चेहरा असलेला फोटो असता नये. अशाप्रकारच्या कॅलेंडरमुळे वास्तूदोष निर्माण होतो, असे सांगितले जाते.
7 / 7
अनेक लोक असे असतात जे दरवाजाच्या मागे कॅलेंडर लटकवतात. मात्र, असे कधीही करू नये. असे केल्यास कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच आयुष्यही कमी होते, असे म्हणतात.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र