राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जर तुम्हाला कुणी इग्नोर करत असेल तर त्याला इग्नोर कसं कराल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 16:14 IST
1 / 7कुणी आपल्याला इग्नोर करत असेल किंवा टाळत असेल तर हे जाणून घेणे फारच त्रासदायक असतं. कुणाला इग्नोर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या भावनांवर कंट्रोल ठेवावा लागतो. भावनांवर कंट्रोल ठेवणे सोपे नाहीये, पण हे तेव्हा गरजेचं ठरतं जेव्हा फायदा तुमचा होणार असेल. (Image Credit : Cerebral Selling) 2 / 7जर एखादी व्य्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तर त्या व्यक्तीला जाणिव करुन देणे गरजेचे आहे की, कुणी इग्नोर केल्यावर कसं वाटतं. असे करुन तुम्ही एक इम्प्रेशन देता की, तुम्हाला काहीही फरक पडत नाही की, कुणी तुमच्याशी बोलतो अथवा नाही. अशावेळी रिव्हर्स थेरपी काम करते. असे नसेलच तर हे निश्चित आहे की, त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. पण एखाद्या व्यक्ती इग्नोर कसं करायचं याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. (Image Credit : youngmoneyhacker.com)3 / 7स्वत:ला व्यस्त ठेवा - कुणाला इग्नोर करायचं असेल तर तुम्हाला स्वत:ला कामात गुंतवून घ्यावं लागेल. जर तुम्ही त्या व्यक्तीच्या बाबतीत सतत विचार करत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीला दूर करु शकणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ स्वत:ला कामात बिझी करुन घ्या. 4 / 7दुसऱ्या कुणाशी बोला - हा एक मानवी स्वभाव आहे. कुणाला इग्नोर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कुणासोबत बोलणे सुरु करावे लागेल. याने तुम्ही स्वत:ला बिझी ठेवू शकाल आणि त्या व्यक्तीची कमी आठवण काढाल. ज्या व्यक्तीसोबत बोलत आहात त्या व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवणं सुरु करा. 5 / 7आवडत्या गोष्टींना वेळ द्या - जेव्हा आपण आपल्या आवडीच्या एखाद्या गोष्टीमध्ये व्यस्त असतो तेव्हा रिकामा वेळ मिळतच नाही. त्यात तुम्ही मग्न होता. त्यामुळे तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये जास्त वेळ घालवणे सुरु करा. 6 / 7फोन काही दिवस दूर करा - जर तुम्ही तुमच्या फोनशी जोडलेले असाल तर तुम्ही कधीही त्या व्यक्तीला इग्नोर करुन शकणार नाहीत. भावनात्मक होऊन तुम्ही त्याला मेसेज कराल. त्यामुळे तुमचा फोन दूर ठेवा किंवा सोशल मीडियावरही वेळ घालवणे काही दिवस बंद करा. 7 / 7भावनांना आवर घाला - जेव्हाही ती व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल तेव्हा तुम्ही तुमच्या भावनांवर आवर घाला. तुमच्या भावना तुमच्यापर्यंत ठेवा आणि शांत रहा. त्या व्यक्तीसोबत इग्नोर करण्याबाबत काही बोलू नका. याने तुम्ही त्या व्यक्तीला इग्नोर करण्यात अपयशी ठराल.