शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पतीची 10 प्रेमप्रकरणं समजली; तरीही खूश आहे ही महिला...कसे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 10:07 IST

1 / 8
एका महिलेने तिच्या 30 वर्षांच्या सुखी संसाराचे रहस्यच सोशल मिडीयावर सांगितले आहे. आश्चर्याचे म्हणजे या काळात तिच्या पतीची एक दोन नव्हे तर 10 लफडी तिला माहिती होती. तरीही संसारात खूश असल्याचे श्रेय तिने पतीच्या लफड्यांनाच दिले आहे.
2 / 8
या महिलेने पतीसोबतच्या मजबूत नात्याबाबत सांगितले आहे. दोघेही एकाच कार्यालयात काम करत होते. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. तेव्हा त्या महिलेचा पती क्रिस प्रामाणिक होता. पण दुसरे अपत्य झाले तेव्हा पतीचे बिंग फुटले.
3 / 8
तिचा दुसरा मुलगा तीन महिन्यांचा होता, जेव्हा क्रिसच्या लफड्याबद्दल समजले. तो त्याच्या मैत्रिणीला घेऊन घरी आला होता. तेव्हा ती मोठ्या मुलाला शाळेत आणण्यासाठी बाहेर गेली होती. पण पर्स विसरल्याने पुन्हा घरी आली आणि पतीचे बिंग फुटले.
4 / 8
घरातून तिने घाईघाईत पर्स घेतली तेव्हा आतून आवाज ऐकायला येत होते. मी सुरुवातीला न ऐकल्यासारखे केले आणि निघतच होते. मात्र, आवाजांनी मला रहावले नाही आणि दोघांना एकत्र नको त्या अवस्थेत पाहिले. पण त्यांना समजू दिले नाही, असे या महिलेने म्हटले आहे.
5 / 8
चोरट्या पावलांनी मी शाळेत गेले. मला प्रचंड धक्का बसला होता. क्रिसवर रागही आला होता. पण मन रोखले. मी मुलांसाठी नोकरी सोडली, संसार करतेय. दोघांमध्ये सेक्स लाईफही चांगली सुरू आहे. मग याला दुसऱ्या महिलेची गरज का भासली? असा प्रश्न पडला होता.
6 / 8
त्याला याचे उत्तर विचारावे तर तो त्रस्त होईल, सोडून जाईल असे वाटले होते. पण तो मलाही वेळ देत होता. मुलांनाही देत राहिला. यामुळे मी विचार बदलला, असे या महिलेने सांगितले.
7 / 8
त्यानंतर त्याची जवळपास 10 लफडी समजली. या महिला कोणत्या तरी समारंभात, पार्टीमध्ये दिसायच्या. भेटल्या की मी त्यांच्याशी आवर्जून बोलायचे. माझ्या याच वागण्यावरून त्या हैराण होताना त्यांच्या डोळ्यात मी पाहिले आहे. हा क्षण माझ्यासाठी सुखाचा असायचा, असे रहस्य या महिलेने सांगितले.
8 / 8
आम्हाला नातू झाला तेव्हाही माझ्या पतीचे लफडे एका महिलेसोबत सुरू होते. पण क्रिसने कबुली दिली आणि चुकीचे वागल्याची माफीही मागितली. मात्र, मीच त्याला थांबवत आता या बोलण्याला काही अर्थ नसल्याचे सांगितले, असेही या महिलेने सांगितले.
टॅग्स :relationshipरिलेशनशिप