शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

दगाबाज पत्नीवर पतीने उगवला असा सूड, तिच्या पायाखालची जमीनच सरकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 11:40 IST

1 / 11
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या अनेक विचित्र घटना समोर येत असतात. एका महिलेने सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे तिचं वैवाहिक जीवन कसं बदललं याबाबत एका रिलेशनशिप पोर्टलवर सांगितलं आहे. या महिलेच्या पतीने कशाप्रकारे सूड घेतला ते हैराण करणारं आहे.
2 / 11
ऑस्ट्रेलियातील या महिलेने सांगितले की, ८ वर्षांआधी तिचं लग्न रॉबर्ट नावाच्या तरूणासोबत झालं होतं. महिलेने सांगितले की, मुलगा झाल्यानंतरच त्यांच्या वैवाहिक जीवनातून प्रेम गायब झालं होतं. महिलेने लिहिले की, 'मुलगा ३ वर्षांचा झाल्यानंतर मी माझा एक बेस्ट फ्रेन्ड टिम याला भेटले. टिम सिंगल होता आणि माझ्यापेक्षा काही वर्षाने लहान होता'.
3 / 11
महिलेने लिहिले की, 'हळूहळू आमचं अफेअर सुरू झालं. इतक्या वर्षांनी मी फार आनंदी होते आणि मला स्वतंत्र वाटत होतं. मी आणि टिम बाहेर भेटू लागलो होतो. आम्ही नेहमी हॉटेलमध्ये थांबत होतो. जेव्हा त्याचा रूममेट घरात नसे तेव्हा मी त्याच्या घरी जात होते.
4 / 11
महिलेने लिहिले की, 'रॉबर्टबाबत विचार करून मला अपराधबोध वाटत होता. पण मग मी स्वत:ची समजूत काढत होते की, आम्ही जर एकमेकांवर प्रेमच करत नाहीत तर मी इतका का विचार करते? रॉबर्टसाठी मी केवळ त्याच्या मुलाची आई होते. रॉबर्टऐवजी मला प्रेम आणि काळजी टिमकडून मिळत होती'.
5 / 11
मात्र, लवकरच महिलेला तिच्या चुकीची जाणीव झाली. तिने सांगितले की, टिमसोबत अफेअर करणं माझी सर्वात मोठी चूक होती. महिलेने लिहिले की, 'नात्याला ६ महिने झाल्यानंतर टिमचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू झालं. त्याने मला दगा दिला. मी पूर्णपणे बिथरली होते. मी इतकी शॉकमध्ये होते की, मी सगळं काही रॉबर्टला सांगितलं'.
6 / 11
माझ्या अफेअरबाबत जाणून घेतल्यावर रॉबर्टला फार दु:खं झालं. मी त्याला पुन्हा पुन्हा माफी माग होते. रॉबर्टने सुद्धा हे मान्य केलं की, तो माझ्यावर जास्त लक्ष देऊ शकत नव्हता ज्यामुळे मी दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ गेले'.
7 / 11
'आम्ही काउन्सेलरला भेटलो आणि हळूहळू आमचं नातं पुन्हा रूळावर येऊ लागलं होतं. मी माझ्या ब्रेकअपमधून बाहेर पडत होते आणि मला विश्वास बसला होता की, रॉबर्टने मला माफ केलं. या सर्व गोष्टींदरम्यान माझी बेस्ट फ्रेन्ड गिनाने मला चांगली साथ दिली'.
8 / 11
महिलेने पुढे लिहिले की, 'मी माझे सर्व रहस्य गिनासोबत शेअर करत होती. पण मला हे माहीत नव्हतं की, रॉबर्टही गिनाला सर्व गोष्टी सांगतो. गिना आता माझ्यासोबत कमी बोलत होती. तिने माझा फोन घेणे किंवा मेसेजला उत्तर देणेही बंद केलं होतं. मला वाटलं ती मला दूर करते आहे'.
9 / 11
काही दिवसांनी अचानक रॉबर्ट मला म्हणाला की, त्याला घटस्फोट हवा आहे. हे ऐकून मला चांगलाच धक्का बसला. कारण मला वाटत होतं की, आमच्यात सगळं काही ठीक होत आहे. यानंतर रॉबर्टने जे मला सांगितलं जे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रॉबर्ट म्हणाला की, तो आणि गिना एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांना एकत्र रहायचं आहे'.
10 / 11
'रॉबर्ट म्हणाला की, त्याने जे माझ्यासोबत जे केलं त्याची मी हकदार आहे. कारण मी त्याला दगा दिला होता. मला जाणीव झाली की, इतक्या वर्षातही तो माझ्या अफेअरला विसरू शकला नव्हता. आणि मी दगा दिल्याचा सूड त्याने मला दगा देऊन घेतला. मला यावर विश्वास बसत नव्हता की, रॉबर्ट खरंच गिनावर प्रेम करतो'.
11 / 11
महिलेने शेवटी लिहिले की, 'मला विश्वास आहे की, दोघे जास्त काळ सोबत राहणार नाहीत. रॉबर्ट लवकरच माझ्याकडे परत येईल. मी तोपर्यंत त्याचे वाट बघणार'.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप