शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

प्लंबरच्या प्रेमात पडली महिला, आता दुर्लक्ष करणारा पती पत्नीला रोखण्यासाठी करतोय 'हे' काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 15:56 IST

1 / 9
एका विवाहित महिलेने एका रिलेशनशिप पोर्टलवर एक्सपर्टला तिच्या वैवाहिक जीवनाबाबत सल्ला मागितला आहे. ४३ वर्षीय ही महिला ३ मुलांची आई आहे. तर तिचा पती ४५ वर्षाचा आहे. दोघांच्याही लग्नाला २० वर्षे झाली आहेत.
2 / 9
आजतकच्या वृत्तानुसार, महिलेने लिहिले की, 'गेल्या १० वर्षात माझ्या पतीने आमचं नातं टिकवून ठेवण्यासाठी स्वत:हून काहीच प्रयत्न केले नाहीत. माझा पती फार चांगला आहे. पण आमच्या लग्नात आता काही शिल्लक राहिलेलं नाही. त्याच्याबाबत माझा उत्साह संपला आहे'.
3 / 9
तिने पुढे लिहिले की, 'माझा पती केवळ आपल्या कामात आणि पैशांमध्ये व्यस्त राहतो. गेल्या एक वर्षात तर त्याचं वागणं फारच बदललं आहे. तो माझ्यासोबत वॉक करायलाही येत नाही. इतकेच काय तर मुलांनाही वेळ देत नाही. मला आता त्याच्याबाबत काही जवळीकता वाटत नाही आणि माझं आता दुसऱ्यावर प्रेम आहे'.
4 / 9
'गेल्यावर्षी घरी पाइप खराब झाल्यावर मी एका प्लंबरला बोलवलं होतं. त्यावेळी माझा पती ऑफिसला गेला होता. पहिल्या नजरेतच माझं त्याच्यावर प्रेम जडलं. पाइप ठिक झाल्यावर आम्ही दोघांनी सोबत चहा घेतला. आम्ही बराचवेळ गप्पा मारल्या. त्याने सांगितले की, तो ४३ वर्षांचा आहे आणि विवाहित आहे. त्याने हेही सांगितले की, त्याचं वैवाहिक जीवनही काही ठिक सुरू नाहीये'.
5 / 9
महिलेने लिहिले की, 'दुसऱ्या दिवशी मला त्याचा मेसेज आला की, त्याने मला स्वप्नात पाहिलं. त्यानंतर मी त्याला भेटायला त्याच्या घरी गेले होते. आम्ही दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आलो. मला त्याला भेटून फार चांगलं वाटत होतं'. (प्रातिनिधीक छायाचित्र)
6 / 9
'मला हे नातं पुढे न्यायचं होतं. मी माझ्या पतीला सांगितलं की, मला आता त्याच्यासोबत रहायचं नाहीये. पण जेव्हापासून मी त्याला हे सांगितलं. तेव्हापासून त्याच्या वागण्यात एकाएकी बदल झाला. तो आमचं वैवाहिक जीवन ठिक करण्याचा प्रयत्न करत आहे'.
7 / 9
महिलेने पुढे लिहिले की, 'आता माझा पती माझी विचारपूस करतो. सोबत जेवण करतो. मुलांना वेळ देतो. तो त्याच्याकडून मला रोखण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. पण मला याचा रागही येत आहे की, त्याने आपलं प्रेम आणि काळजी दाखवायला इतका उशीर केला. मी आता माझा निर्णय घेतला आहे'. (प्रातिनिधीक छायाचित्र)
8 / 9
शेवटी महिलेने लिहिले की, 'माझ्या अफेअरबाबत माझ्या पतीला माहिती नाही आणि मला प्रश्न पडलाय की, मी त्याला हे कसं सांगू की, आता त्याचे सर्व प्रयत्न बेकार आहेत'.
9 / 9
महिलेला सल्ला देण्यासाठी एक्सपर्टने लिहिले की, 'तुमच्यातील आणि तुमच्या प्रियकरातील या नव्या प्रेमाचा उत्साह लवकरच नष्ट होईल. भलेही तुमच्या पतीने तुम्हाला किंवा परिवाराकडे दुर्लक्ष केलं असेल. पण त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे. आता तो त्याची चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आणि याचं क्रेडीट त्याला मिळायला हवं'.
टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप