शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मुलांना त्यांची भांडणं स्वतः चं सोडवू द्या; तेव्हाच ते होतील जबाबदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 14:19 IST

1 / 6
लहान मुलं मस्तीखोर असतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून अनेकदा त्यांच्यात आपापसात भांडणं होतात. तर कधी लहान मुलांना हवी असलेली वस्तू मिळाली नाही तर ते चिडचिड करतात. लहान मुलांच्या भांडणात अनेकदा मोठी माणसं हस्तक्षेप करतात. त्यामुळे ती भांडण कधी कधी जास्त वाढतात. मुलांना त्याची भांडणं स्वत: च मिटवायला सांगा. कारण असं केल्यास ते जबाबदार व्यक्ती बनू शकतात.
2 / 6
मित्रांसोबत भांडण झाल्यास काही वेळा मुलं लगेचच नाराज होतात. तर काही मुलं खूप जास्त चिडचिड करतात. अशा वेळी परिस्थिती कशी शांतपणे हाताळायची याचा सल्ला मुलांना नक्की द्या.
3 / 6
खेळताना बऱ्याचदा खेळण्यांवरून लहान मुलांमध्ये भांडणं होतात. दुसऱ्या मुलाने आपली वस्तू घेतली की लगेचच मुलांना राग येतो. अशावेळी मुलांना मिळून मिसळून खेळण्याचा सल्ला द्या. आपली खेळणी इतरांसोबत शेअर करायला सांगा.
4 / 6
लहान मुलं भांडणामुळे अनेकदा खूप जास्त हायपर होतात. अशा वेळी त्यांना रिलॅक्स होण्याचा सल्ला द्या. मुलांना शांत राहायला सांगा तसेच राग आल्यास दीर्घ श्वास घ्या व 1 ते 10 पर्यंत आकडे मोजा.
5 / 6
मुलं भांडणं झाल्यास मोठमोठ्याने आरडाओरडा करतात. तसेच चुकीच्या भाषेचा वापर करतात. त्यामुळे त्यांना भांडणं झाल्यास एकमेकांना समजून सांगण्याचा सल्ला द्या.
6 / 6
भांडणामध्ये प्रामुख्याने दोघांची चूक असते. पण लहान मुलं आपली चूक मान्य करायला तयार नसतात. भांडताना ते अनेकदा समोरच्या मित्राला रागाच्या भरात मारतात. पण हे चुकीचं असल्याचं मुलांना पटवून द्या. त्यांना त्यांची चूक झाल्यास मान्य करायला सांगा. तसेच सॉरी बोलायला शिकवा.
टॅग्स :Parenting Tipsपालकत्व