शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

रोज डेच्या दिवशी गुलाब देत असाल तर आधी त्याचा अर्थ जाणून घ्या, नाहीतर गैरसमज होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 18:00 IST

1 / 6
७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होणार आहे. ज्यामध्ये पहिला दिवस रोज डे म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानंतर, टेडी डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे हे दिवस १४ फेब्रुवारीपूर्वी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे पूर्वी संपूर्ण आठवडाभर साजरे केले जातील.(Rose Day 2022)
2 / 6
गुलाबी गुलाब :- जर तुमचे लग्न आताच झाले असेल किंवा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला डेटवर घेऊन जाण्याची तयारी करत असाल. तर, तुम्ही तिला गुलाबी रंगाचा गुलाब देऊ शकता. तुम्ही ते एखाद्या मित्रालाही देऊ शकता कारण हा गुलाब एखाद्याची स्तुती करण्यासाठी दिला जातो. मग तो तुमचा चांगला मित्र किंवा इतर कोणीही असू शकतो. यासोबतच, हा गुलाब कोमलता, नम्रता तसेच नवीन नातेसंबंधांची सुरुवात यांचे लक्षण आहे.
3 / 6
लाल गुलाब :- जर तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करत असाल आणि तुमच्या भावना त्याच्यासमोर व्यक्त करायच्या असतील तर त्याला लाल गुलाब द्या. लाल गुलाब हे प्रेमाचे लक्षण मानले जाते.
4 / 6
लॅव्हेंडर गुलाब :- लॅव्हेंडर गुलाब पहिल्या दृष्टीक्षेपात प्रेम किंवा आकर्षण व्यक्त करण्यासाठी असतात. तर, जर तुम्ही पहिल्या नजरेतच एखाद्याच्या प्रेमात पडला असाल. तर, तुम्ही तिला हा गुलाब देऊ शकता.
5 / 6
पांढरा गुलाब :- पांढरा गुलाब शुद्धता, निष्पापपणा आणि बिनशर्त प्रेमाचे प्रतीक आहे. हे शांततेचे प्रतीक देखील मानले जाते. हे दर्शविते की तुम्ही तुमचे नाते दीर्घकाळ टिकण्याचे वचन देता. जर तुमचे कोणावर खूप प्रेम असेल तर तुम्ही त्यांना लाल आणि पांढऱ्या गुलाबाचे पुष्पगुच्छ देखील देऊ शकता. याशिवाय, जर तुम्हाला तुमच्या खास व्यक्तीला सॉरी म्हणायचे असेल तर यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही
6 / 6
पिवळा गुलाब :- जर तुम्हाला एखाद्याशी मैत्रीसाठी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही त्याला पिवळा गुलाब देऊ शकता. मैत्रीची सुरुवात करण्यासाठी पिवळा गुलाब चांगला मानला जातो. पिवळा गुलाब मैत्री आणि आनंदाचे प्रतीक आहे. यासोबतच तो एखाद्याला 'गेट वेल सून' म्हणण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप