शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 17:21 IST

1 / 6
माणसाच्या आयुष्यात आता घटस्फोट हा देखील एक टप्पा बनला आहे. लग्नानंतर संसार, मुले, मुलांचे शिक्षण असा हा रहाटगाडा आता मध्येच घटस्फोटाच्या स्पीडब्रेकरवर आदळत आहे. तुम्हीही आजुबाजुला पहाल तर जवळपास सर्वच घरांत नातेवाईकांमध्ये घटस्फोटाच्या चर्चा घडत असतात. यामध्ये मुलीला पोटगी मिळाली, वन टाईम सेटलमेंट झाली असे काहीतरी बोलले जाते. परंतू, कधीच मुलाला पोटगी मिळाली असे ऐकायला येत नाही. असे का...पुरुषाला पोटगी मिळत नाही का...
2 / 6
कायदे हे स्रियांच्या हक्कांचे संरक्षण करणारे आहेत. यामुळे संसार मोडायचा असला की महिलांकडून कौटुंबिक हिंसाचार, पतीचे अफेअर, सासू, नणंद किंवा अन्य कोणाकडून छळ असे अनेक आरोप केले जातात. अनेकदा या कायद्यांचा वापर मुलाकडच्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो. यामुळे ते नामोहरम होतात आणि पत्नी मागेल तेवढी पोटगी देण्यास तयारही होतात. सध्या अशीच भावना लोकांमध्ये आहे. परंतू, पती देखील पत्नीकडून पोटगी मिळवू शकतो, हे मात्र कोणाला माहिती नाही.
3 / 6
जर पती जास्त पैसे कमवत असेल आणि पती तिच्यापेक्षा कमी किंवा काहीच करत नसेल तर अशा परिस्थितीत पोटगी पत्नीऐवजी पतीला मिळते. परंतू, असे खूपच कमी वेळा होते. आपला समाज पुरुषप्रधान असल्याने पतीच जास्त कमावता असतो. फार कमीवेळा पत्नी पतीपेक्षा जास्त कमावती असते. यामुळे घरावरील कर्ज, वाहनावरील कर्ज किंवा अन्य गोष्टी या पतीच्याच नावावर असतात. त्यालाच ते फेडायचे असते. यामुळे घटस्फोटाला अर्ज गेला तरी तो बेरोजगार असल्याचे दाखवू शकत नाही. यामुळे कितीही केले तरी पती आपले उत्पन्न कमी करू शकत नाही.
4 / 6
उलट पत्नी कमावती असेल तर ती काही काळासाठी नोकरी सोडू शकते. असे प्रकार घडतात. घटस्फोटाच्या प्रकरणात या गोष्टी सर्रास केल्या जातात. याचा फायदा महिलांना पोटगी मिळण्यासाठी होतो. जर पत्नीचे उत्पन्न पती पुराव्यानिशी सिद्ध करू शकला तरच पत्नीला पोटगी मिळत नाही. यामुळे बहुतांश प्रकरणात पत्नीलाच पोटगी दिली जाते. यामुळे लोकांचा हाच समज आहे की महिलेलाच पोटगी मिळते.
5 / 6
जर पत्नीचे उत्पन्न आहे आणि ती त्यावर आपला उदरनिर्वाह करू शकत असेल आणि जर पतीच्या उत्पन्नावर तो त्याच्या उदरनिर्वाह करू शकत नसेल तर अशा परिस्थितीत कोर्ट घटस्फोटावेळी पतीला पोटगी देण्याचा निर्णय देऊ शकते.
6 / 6
हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम २४ आणि २५ नुसार, पती पत्नीकडून पोटगी किंवा देखभाल मागू शकतो. पोटगी मिळविण्यासाठी हे सिद्ध करावे लागेल की तो त्याच्या उदरनिर्वाहासाठी त्याच्या पत्नीवर अवलंबून होता आणि घटस्फोटानंतर त्याची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते, ज्यामुळे त्याला उदरनिर्वाह करण्यात अडचणी येऊ शकतात.
टॅग्स :Divorceघटस्फोटrelationshipरिलेशनशिप