माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डकडून 'या' गोष्टी ऐकण्यासाठी असतात उत्सुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 13:38 IST
1 / 6सर्वांनाच हे माहीत आहे की, मुलींना आपल्या पार्टनरकडून त्यांचं कौतुक ऐकणं किती पसंत असतं. पण काय कधी तुम्ही याचा कधी विचार केलाय का की, तुमच्या पार्टनरलाही तुमच्याकडून काहीतरी ऐकायचं असतं. मुलींप्रमाणे मुलंही आपल्या आपल्या गर्लफ्रेन्डच्या तोंडून काही गोष्टी ऐकण्यासाठी उत्सुक असतात. चला जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी...2 / 6प्रत्येक मुलाला असं वाटत असतं की, त्याच्या गर्लफ्रेन्डने त्याला याची जाणिव करुन द्यावी की, त्याचं तिच्या आयुष्यात किती महत्त्व आहे. त्याला हे ऐकायचं असतं की, त्याच्या गर्लफ्रेन्डने त्याला म्हणावं की, मला तुझ्यासोबत असताना खूप चांगलं वाटतं. त्यांना वाटत असतं की, तिने म्हणावं की, मला तुझ्यासोबत असताना सुरक्षित वाटतं. 3 / 6ज्याप्रकारे मुलींना असं वाटत असतं की, मुलांनी त्यांच्या लूक्सचं, ड्रेसिंग सेन्सचं कौतुक करावं. तसंच मुलांनाही वाटत असतं की, त्यांच्या गर्लफ्रेन्डनेही त्यांचं कौतुक करावं. त्यांनीही म्हणावं की, तुझा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे. आज तू फार स्मार्ट दिसतोय. 4 / 6रिलेशनशिपमध्ये काही काळाने भांडणं होत असतात. मुली लगेच मुलांना तू आधीसारखा नाही राहिलास असं म्हणतात. कारण होतं काय की, मुलं सुरुवातीला गर्लफ्रेन्डची खूप काळजी घेतात. नंतर जरा यात फरक पडतो. त्यामुळे त्यांना मुलींचे असे टोमणे सतत ऐकावे लागतात. पण मुलांना हे ऐकणे पसंत नसतं. त्यांना वाटत असतं की, गर्लफ्रेन्डने म्हणावं की, तू माझ्यासोबत असाच रहा. तू सोबत असलास की मला कशाचीही चिंता नाही. 5 / 6मुलांना असंही वाटत असतं की, त्यांच्या गर्लफ्रेन्डनी त्यांना म्हणावं की, माझ्या आयुष्यात खूप मुलं मित्र झाले, खूप लोकांना मी ओळखते, पण तू सगळ्यात स्पेशल आहेस. तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस. असे वाटते की, तू केवळ माझ्यासाठीच आहेस. 6 / 6नेहमीच मुली या आपल्या पार्टनरला मित्रांसोबत पार्टीला किंवा कुठे बाहेर जाण्यासाठी तगादा लावत असतात. पण मुलांना असं वाटत असतं की, त्यांनी त्यांच्या पर्सनल स्पेसचा विचार करावा. कुणासोबतही कुठेही गेलं तरी विश्वास ठेवावा. तिने म्हणावं की, माझा तुझ्यावर विश्वास आहे.