By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 18:18 IST
1 / 62 / 6श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रीडा संकुलाच्या परिसरात माडगरूड, ककनेर, तिबोटी खंड्या, ब्राह्मणी घार, कोतवाल, रानकोंबडी, हरियाल (महाराष्ट्राचा राज्यपक्षी) असे विविध पक्षी एकाच ठिकाणी पाहण्याची संधी 3 / 6उन्हाळ्यात पाणपक्षी मोठ्या प्रमाणावर येतात. जून ते नोव्हेंबर या काळात टिबोटी खंड्या प्रजननाकरिता येथे येतात4 / 6गुहागर तालुक्यातील आबलोली येथे पक्षी निरीक्षक खास टिबोटी खंड्या पाहण्यासाठी येत असतात; पण आता हाच टिबोटी खंड्या एसव्हीजेसीटीच्या परिसरामध्ये पाहायला मिळताे.5 / 6या परिसरात वेडा राघू, मलबार राखाडी धनेश, गप्पीदास, हळद्या, पावशा, कोतवालच्या प्रामुख्याने तीन प्रजाती, सूर्यपक्षी, नारंगी गोमेट, नवरंग, पाणकोंबडी, बलाक चोच खंड्या (किंगफिशर), निखार, करकोचा (वुली नेक स्टॉर्क), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन) हे पक्षी वर्षभर आढळतात. 6 / 6डेरवण (ता. चिपळूण) येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. राहुल चोपडे या परिसरात फिरून पक्षी निरीक्षण करतात. पक्षी निरीक्षण करताना त्याचे सुंदर छायाचित्रण त्यांनी केले आहे.