1 / 12मेष- खर्चावर नियंत्रण ठेवा: ग्रहमान संमिश्र राहील. आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. मात्र अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. अन्यथा हाती आलेले पैसे खर्च होऊन जाण्यास वेळ लागणार नाही. धार्मिक कार्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होईल. काहीना प्रवास करावा लागेल. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. मात्र किरकोळ कारणावरून गैरसमज करून घेऊ नका. मुलाशी संवाद साधला पाहिजे त्याना योग्य मार्गदर्शन करा. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमचे कौतुक होईल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.2 / 12वृषभ- व्यवसायात अतिशय अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. घरी पाहुणे येतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळेल. मोठी संधी मिळेल. प्रवास घडतील. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च केला जाईल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. भावंडाशी गैरसमज करून घेऊ नका. काही कारणाने वाढ होण्याची शक्यता आहे. टीप मंगळवार, बुधवार, गुरुवार चागले दिवस.3 / 12मिथुन- अनुकूल अनेक अडचणी दूर होतील. प्रवासाचे योग येतील. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अचानक बढती मिळेल. पगारवाढीच्या मागणीसाठी प्रयत्न करीत असाल तर यश मिळेल. घरी पाव्हण्या रावळ्यांची लगबग राहील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. मनात काळजीचे विचार राहतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे करीत राहणे आवश्यक आहे. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.4 / 12कर्क - विविध लाभ होतील. अनुकूल परिस्थिती राहील. नफ्याचे प्रमाण वाढेल. नवनवीन प्रयोग करून पाहिले जातील. इतरांची साथ मिळेल. सप्ताहाच्या प्रारंभी प्रवास टाळणे योग्य ठरेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. मानमरातब मिळेल. नोकरीत काही अनपेक्षित बदल होतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. सरकारी कामात यश मिळेल. अनेक लोक अनपेक्षितपणे मदत करण्यास पुढे येतील. टीप मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.5 / 12सिंह - धनलाभ होईल. काही कटू काही गोड अनुभव या सप्ताहात येतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. जीवनसाथी चांगली साथ देईल. मुलांच्या बाबतीत संभ्रमावस्था राहील. त्यांच्यावर ताण वाढेल असे दडपण आणू नका. त्यांच्या अडचणी समजून घ्या. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. आर्थिक बाजू चांगली राहील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील. नवीन संधी मिळेल. नोकरीत प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. टीप रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.6 / 12कन्या - हा सप्ताह यश देणारा असलातरी कामाचा व्याप वाढणार आहे. थोडी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. जुनी दुखणी त्रस्त करू शकतात. थोडे पथ्यपाणी सांभाळा. जीवनसाथी चांगली साथ देईल. प्रवासात दगदग होईल. काळजी घ्या. वाहन जपून चालवा. कागदपत्रे जागच्या जागी ठेवा. काहीना अचानक धनलाभ होईल. जुन्या गुंतवणुकीचा लाभ होईल. एखाद्या क्लिष्ट प्रकरणाचा उलगडा होईल. त्यामुळे मनावरील दडपण निघून जाईल. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.7 / 12तूळ - ग्रहमान सामान्य राहील. काही ठिकाणी संघर्ष करावा लागेल. हाती घेतलेले काम झालेच पाहिजे, असा अट्टहास करू नका. कधी कधी संयम बाळगणे आवश्यक असते. महत्त्वाचे काम या सप्ताहात करणे टाळले, तर चांगले राहील. प्रवासात काळजी घ्या. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. दुखणे अंगावर काढू नका. मनात लेष्ट काळजचे विचार राहतील. भविष्याची चिंता नावरील वाटत राहील. गुप्त शत्रूपासून सावध राहा. जीवनसाथी चांगली साथ देईल. कुणी तुम्हाला मोहात अडकवण्याचा प्रयत्न करेल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.8 / 12वृश्चिक - लाभदायक परिस्थिती राहील. नोकरीत काही अनपेक्षित बदल होतील. घर आणि नोकरी या दोन्हीकडे लक्ष देताना धावपळ होईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. मुलांचे कौतुक होईल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. तुमचा नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. मानसन्मान, प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. शत्रू डोके वर काढतील. मुत्सद्दीपणाने बोलून कामे करून घ्याल. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.9 / 12धनू- भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. काही कारणांनी व्यवहारावरून वाद होऊ शकतात. संयमाने परिस्थिती हाताळली पाहिजे. घरी पाहुणे येतील. नोकरीत बदली होऊ शकते. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. मुले प्रगती करतील. जीवनसाथीचे ऐका. आर्थिक आवक चांगली राहील. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. टीप - मंगळवार, बुधवार, गुरूवार चांगले दिवस10 / 12मकर- आपल्या अनेक कलागुणांना वाव मिळेल. लोकांचे प्रोत्साहन मिळेल. नोकरी व्यवसायात प्रगतीला पूरक वातावरण राहील. आपल्यावर मोठी जबाबदारी पडेल. त्यात तुमचा कस लागेल आणि यशस्वी व्हाल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. घरी पाहुणे, जवळचे मित्र येतील. वाहनाची दुरुस्ती वेळीच करून घ्या. भावंडांसमवेत वेळ घालवता येईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.11 / 12कुंभ - विविध प्रकारचे लाभ होतील. घर, शेती खरेदी करण्याचा विचार प्रत्यक्षात येईल. मनासारखे भोजन मिळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. जोडीदार चांगली साथ देईल. अचानक मोठा फायदा होईल. भावंडांशी सख्य राहील. जवळपासचे प्रवास होतील. प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून राहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. जाणकारांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.12 / 12मीन- जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. जागेची कागदपत्रे सांभाळून ठेवा. अनोळखी व्यक्तींना तुमची गोपनीय माहिती देऊ नका. विशेषतः क्रेडिट कार्ड, पासवर्ड इत्यादी माहिती देऊ नका. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील. एखादी व्यक्ती तुम्हाला मोहात अडकविण्याचा प्रयत्न करेल. नोकरीत प्रगतीला वाव मिळेल. नवीन मित्र भेटतील. नवीन व्यवसायाची माहिती कळेल. टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार चांगले दिवस.