1 / 6पुण्यातील पोर्शे कार अपघातावेळी काय घडले हे प्रत्यक्ष पाहणारा समोर आला आहे. बिल्डरच्या बाळाने जेव्हा दुचाकीस्वाराला उडविले तेव्हा मागे बसलेली मुलगी १५ फुट उंच उडाल्याचे आपण पाहिल्याचे संकेत नावाच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. अपघात एवढा भयानक होता की त्या दुचाकीवरील तरुणाच्या शरीराचे बेकार हाल झाले होते. 2 / 6 पोर्शे कारचा वेग खूप अधिक होता. कारने मोटरसायकलला एवढ्या जोराने टक्कर मारली की आम्हाला काहीच कळले नाही. तरुणीचा जागीच मृत्यी झाला. ती माझ्या डोळ्यासमोर १५ एक फीट उंच उडाली होती. तर तरुणाच्या शरीराला जोराचा मार लागला होता, असे या संकेतने सांगितले आगे. आजतक ने हे वृत्त दिले आहे. 3 / 6पोर्शे कारमध्ये बिल्डरच्या मुलासह आणखी दोन ते तीन लोक होते. अपघातानंतर बिल्डरचे बाळ पळून जाऊ शकले नाही कारण त्याच्या कारच्या सर्व एअरबॅग उघडल्या होत्या. यामुळेच हे लोक कारच्या बाहेर आले होते, असे संकेत म्हणाला. 4 / 6यानंतर तिथे गर्दी जमू लागली. या गर्दीतील लोकांनी आरोपी बिल्डर बाळाला पकडले आणि मारहाण केली. जेव्हा पोलिस आले तेव्हा त्यांच्याकडे या आरोपीला मी सोपविल्याचे या संकेत नावाच्या वक्तीने सांगितले. 5 / 6पोर्शे कार हा बिल्डरचा मुलगाच चालवत होता. ते पूर्णपणे नशेत होता. त्याला लोक एवढे मारत होते तरी त्याला काही कळत नव्हते. त्याला काही फरक पडत नव्हता. मी त्याला गाडीकडे घेऊन गेलो आणि त्याला दाखविले की हे बघ तू काय केले आहे, असा गौप्यस्फोट संकेतने केला. 6 / 6जेव्हा गर्दी त्याला मारहाण करत होती तेव्हा कोणालाच तो कोण आहे हे माहिती नव्हते. त्याच गर्दीतून कोणीतरी म्हटले ''अरे हा अग्रवालचा मुलगा आहे. ब्रह्मा रियलटी बिल्डरचा मुलगा, तेव्हा लोकांना समजले, असा दावा संकेतने केला.