शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PHOTOS: रंगीबेरंगी फुलांनी सजले 'एम्प्रेस गार्डन'; रविवारपर्यंत पुष्पप्रदर्शनाचा आनंद लुटता येणार

By श्रीकिशन काळे | Published: January 25, 2024 4:28 PM

1 / 10
दरवर्षी एम्प्रेस गार्डन येथे फ्लॉवर शोचे आयोजन करण्यात येते. यंदा या शोचे उद्घाटन पोलीस आयुक्त कार्यालय झोन चारचे उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या हस्ते झाले.
2 / 10
या प्रसंगी एम्प्रेस गार्डनचे विश्वस्त प्रतापराव पवार, सचिव सुरेश पिंगळे, अनुपमा बर्वे, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते. हे पुष्प प्रदर्शन २८ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ७.३० पर्यंत नागरिकांसाठी खुले असणार आहे.
3 / 10
यामध्ये शंभरहून अधिक विविध नर्सरी, पुष्प प्रदर्शन असे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. ॲग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियातर्फे गार्डनचे कामकाज पाहिले जाते.
4 / 10
१८३० पासून ही संस्था कार्यरत असून, एम्प्रेस गार्डनला गेल्या कित्येक वर्षांपासून ते सांभाळत आहेत. अतिशय निसर्गरम्य असे हे गार्डन असून, दररोज हजारो नागरिक भेट देतात.
5 / 10
यंदाच्या पुष्पप्रदर्शनात फुलांची कलात्मक मांडणी, भाजीपाला स्पर्धा, आकर्षक व शोभिवंत पानांच्या कुंड्या तयार करून ठेवल्या आहेत.
6 / 10
पुष्प प्रदर्शनानिमित्त दरवर्षी बाग विविध प्रकारच्या उद्यान रचना, आकर्षक कुंड्यांची मांडणी, विविध पानाफुलांची रचनात्मक मांडणी करून आकर्षकरीत्या सजविते. यंदाही बाग सुंदर सजविण्यात आली आहे
7 / 10
कुंडीमध्ये भाजीपाला कसा लावायचा, तो कसा वाढवायचा यासाठी खास विभाग ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना त्याचा अधिक फायदा होऊ शकतो.
8 / 10
एम्प्रेस गार्डनमध्ये केवळ फुलांची सजावट नाही, तर इतरही अनेक गोष्टी पहायला मिळत आहेत.
9 / 10
लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळ असून, खाद्यजत्राही भरविण्यात आली आहे.
10 / 10
नर्सरीमध्ये विविध प्रकारची रोप ठेवण्यात आली आहेत. आकर्षक पुष्परचनाही पाहता येणार आहे.
टॅग्स :FlowerफुलंPuneपुणेGardening Tipsबागकाम टिप्स