शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अर्थसंकल्पीय अधिवेशन देवेंद्र फडणवीसांनी गाजवले, या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीला सळो की पळो करून सोडले…

By बाळकृष्ण परब | Updated: March 10, 2021 19:48 IST

1 / 6
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले. राज्यात पुन्हा वाढू लागलेला कोरोना, वीजबिलांचा प्रश्न, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून ते ऐन अधिवेशनात घडलेल्या मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूपर्यंत विविध मुद्यांवरून विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीची कोंडी केली. यामध्ये अग्रस्थानी दिसून आले ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. या अधिवेशनातील त्यांच्या कामगिरीचा घेतलेला हा आढावा.
2 / 6
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून विरोधकांनी या प्रकरणात संशयाची सुई असलेल्या संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि फडवीसांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर अधिवेशनापूर्वीच संजय राठोड यांच्या राजीनामा मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागला होता.
3 / 6
त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाला टीकेचे लक्ष्य, केले राज्यातील वाढता कोरोना, कोविड सेंटरमधील भ्रष्टाचार, वीजबिलांचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध मुद्यांवरून राज्य सरकारला घेरले.
4 / 6
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीजबिलांच्या प्रश्नांवरून सरकारची कोंडी केल्यानंतर अजित पवार यांना राज्यातील थकीत असलेल्या वीजजोडण्या तोडणे थांबवण्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
5 / 6
दरम्यान अधिवेशन सुरू असतानाच मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचू घटना घडली होती. त्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारची कोंडी केली. या प्रकरणी हिरेन यांच्या पत्नीचा तक्रार अर्ज वाचून दाखवत सरकारला अधिकच कोंडी केली.
6 / 6
दरम्यान, अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्यावर हक्कभंग आणला.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण