भारतीय महिला-पुरूष खो-खो संघाचे कर्णधार काय करतात? त्यांचा पगार किती? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:27 IST
1 / 11शालेय खेळ म्हणून चर्चा असलेल्या खो-खो खेळाची पहिलीवहिली विश्वचषक स्पर्धा भारतात सुरु आहे. भारताचा पुरुष आणि महिला संघ अपेक्षेप्रमाणे तुफानी कामगिरी करताना दिसत आहे.2 / 11प्रतीक वायकर आणि प्रियांका इंगळे ही दोन नावे सध्या खो-खो जगतात चर्चेत आहेत. भारताला खो खो चा पहिला विश्वविजेता बनवण्याची सर्व जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर आहे.3 / 11भारतीय महिला खो खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे आहे. तर प्रतिक वाईकर भारतीय पुरुष खो खो संघाचे नेतृत्व करत आहे. हे दोघेही खो खो विश्वचषकातून नाव कमावत आहेत.4 / 11पण तुम्हाला माहिती आहे का की, या खेळाव्यतिरिक्त दोन्ही भारतीय कर्णधार काय करतात आणि त्यांचा पगार किती आहे? चला जाणून घेऊया त्यांच्या कामाबद्दल...5 / 11भारतीय महिला खो खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे ही महाराष्ट्राची कन्या आहे. २०२३ मध्ये चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले आहे.6 / 11यापूर्वी २०२२ मध्ये तिला राष्ट्रीय स्तरावर राणी लक्ष्मीबाई पुरस्कारही मिळाला आहे. तिने आपल्या १५ वर्षांच्या खो खो कारकिर्दीत २३ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.7 / 11खो खो खेळण्यासोबतच प्रियांका इंगळे नोकरीही करते. तिने वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. आता ती मुंबईत आयकर विभागात कर सहाय्यक म्हणून काम करते.8 / 11या पदासाठी दरमहा २५,५०० ते ८१,००० रुपये वेतन दिले जाते. प्रियांकाला नुकतीच महाराष्ट्र सरकारने क्रीडा विभागात ग्रेड 2 ची नोकरी ऑफर केली आहे. 9 / 11भारतीय खो खो संघाचा कर्णधार प्रतीक वायकर याचे खो खो शी विशेष आणि खोल नाते आहे. अवघ्या आठ वर्षांचा असताना त्याने या खेळात रस दाखवला. 10 / 11प्रतीकने अल्टीमेट खो-खो लीगमध्ये तेलुगू वॉरियर्सचे नेतृत्वही केले आहे. तसेच राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.11 / 11भारतीय पुरुष खो खो संघाचा कर्णधार प्रतीक हा उच्चशिक्षित आहे. त्याच्याकडे फायनान्समधील पदवीसोबतच कॉम्प्युटर सायन्सची पदवी अशा दोन डिग्री आहेत. क्रीडा कोट्यातून त्याला नोकरी मिळालेली आहे.