Photo : ना गाजावाजा, ना धुमधडाका! जगात नंबर १ असलेल्या भारतीय खेळाडूनं रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 15:41 IST
1 / 9भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी थेट इटलीत लग्न केलं. असे अनेक सेलिब्रेटी आहेत की ज्यांच्या लग्नाची जगभरात चर्चा झाली. 2 / 9जगात नंबर १ असूनही भारताच्या एका खेळाडूने चक्क रजिस्टार ऑफिसमध्ये जाऊन साधेपणानं लग्न केलं... 3 / 9जगात नंबर १ असूनही भारताच्या एका खेळाडूने चक्क रजिस्टार ऑफिसमध्ये जाऊन साधेपणानं लग्न केलं... 4 / 9जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय ( HS Prannoy) याने नुकतंच गर्लफ्रेंड श्वेता गोमेज ( Sweta Gomes) हिच्यासोबत रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन लग्न केलं. 5 / 9BWF वर्ल्ड टुअरच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या प्रणॉयने २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक जिंकून दिले होते. 6 / 9भारताच्या ऐतिहासिक थॉमस कप स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट संघातही त्याचा मोलाचा वाटा होता.7 / 9नवी दिल्लीत जन्मलेल्या ३० वर्षीय प्रणॉय केरळामध्ये राहतो आणि गोपिचंद बॅडमिंटन अकादमीत तो प्रशिक्षण घेतोय. 8 / 9प्रणॉयने २०१०मध्ये युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मुलांच्या एकेरीत रौप्यपदक जिंकून सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर २०११मध्ये बहरीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले होते. 9 / 9सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये स्वतःचे नाव लौकिक केले. त्याने २०१४मध्ये इंडोनेशिया मार्स्टर्स, २०१६ मध्ये स्वीस ओपन व २०१७ मध्ये यूएस ओपन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. २०१४ मद्ये त्याला व्हिएतनाम ओपनमध्ये उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते