Paige Spiranac : 'कधी छोट्या स्कर्टवरून उडवली खिल्ली, स्ट्रिपरही म्हणाले', अमेरिकन गोल्फरचे खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 18:03 IST
1 / 7अमेरिकन प्रोफेशनल गोल्फर Paige Spiranac पुन्हा सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ती नेहमीच तिच्या फोटोंमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. पण तिच्या कपड्यांवर ज्याप्रकारे कमेंट्स आल्या त्यावरून वादविवाद सुरू आहे.2 / 7एका मुलाखतीत Paige ने सांगितलं होतं की, इन्स्टाग्रामवर ती जे तिचे फोटो शेअर करते, त्यावरून तिच्यावर लोक टिका करतात. जेव्हा मी ज्यूनिअर गोल्फर होते, तेव्हाही छोट्या स्कर्टबाबत असंच बोललं जात होतं.3 / 7२८ वर्षीय Paige म्हणाली की, ती सेक्सी आहे. मला माझ्या ब़ॉडीवर प्रेम आहे आणि ही मी खरी आहे. मला नेहमी असेच कपडे घालणं आवडतं. जर तुम्ही गोल्फमध्ये कॉलर नाही घातली तर तुम्हाला लोक स्ट्रिपर म्हणतात किंवा पॉर्न स्टारसोबत तुलना करतात.4 / 7Paige Spiranac आतापर्यंत यूनिव्हर्सिटी लेव्हलवर गोल्फ खेळत आली आहे. आता ती सोशल मीडियावर इन्फ्लूएंसर बनली आहे. जिथे ती गोल्फसंबंधी व्हिडीओ शेअर करते.5 / 7Paige ने सांगितलं की, तिला एका चॅरिटीसाठी काम करायचं होतं. जेणेकरून लहान मुलांची मदत करता यावी. पण चॅरिटीच्या बोर्ड मेंबर्सनी असं होऊ दिलं नाही. कारण त्यांच्या नजरेत माझी इमेज चांगली नव्हती.6 / 7अनेक वाद होऊनही Paige सतत सोशल मीडियावर पॉप्युलर होत जात आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ३.२ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ट्विटरवरही तिला हजारो लोक फॉलो करतात.7 / 7याआधीह ख्रिसमसशी संबंधित फोटो शेअर केल्याने तिला ट्रोल करण्यात आलं होतं. Paige ने हॉलिवूड कॅरेक्टर Harley Quinn च्या ड्रेसला कॉपी केलं होतं. तेव्हाही तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं.