शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Longest Grand Slam Final : अल्काराझ-सिन्नर ५ तासांहून अधिक खेळले; पण अजूनही जोकोविच-नदाल टॉपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 20:36 IST

1 / 8
टेनिस जगतात दुसऱ्या स्थानावर असलेला स्पॅनिश टेनिसपटू कार्लोस अल्काराझ याने फ्रँच ओपन २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नंबर वन इटालियन टेनिसपटू यानिक सिन्नर याला पराभूत करत लाल मातीच्या कोर्टवरील आपला रुबाब कायम ठेवला.
2 / 8
कार्लोस अल्काराझ आणि यानिक सिन्नर यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. या लढतीसह फ्रेंच ओपन स्पर्धेत एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
3 / 8
फ्रँच ओपन स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक वेळ रंगलेली फायनल ठरली. दोघांच्यातील लढत ५ तास २९ मिनिटे चालली.
4 / 8
फ्रेंच ओपनच्या फायनलमधील या आधीचा रेकॉर्ड हा अर्जेंटिनाचा दिग्गज टेनिस स्टार गिलेर्मो विलास आणि स्वीडनचा मॅट्स विलॅंडर या जोडीच्या नावे होता. १९८२ मध्ये दोघांच्यातील फायनल ४ तास ४२ मिनिटे इतका वेळ चालली होती. ज्यात विलँडरनं फायनल बाजी मारली होती.
5 / 8
अल्काराझ आणि सिन्नर यांच्यातील लढत फ्रेंच ओपनच्या फायनलमधील सर्वाधिक वेळ चाललेली लढत ठरलीये. पण ती ग्रँडस्लॅम स्पर्धेतील 'लाँग टाइम' फायनल नाही.
6 / 8
ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक वेळ चाललेला अंतिम सामना हा २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळला गेलाय.
7 / 8
२०१२ च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल यांच्यात रंगलेला अंतिम सामना हा ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सर्वाधिक वेळ रंगलेली अंतिम लढत आहे.
8 / 8
ग्रँडस्लॅम स्पर्धेतील हा अंतिम सामना ५ तास ५३ मिनिटे एवढा वेळ चालला होता. ज्यात नोवाक जोकोविच याने 5-7, 6-4, 6-2, 6-7 (5), 7-5 अशा फरकाने राफेल नदाल याला पराभूत करत तिसऱ्यांना ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती.
टॅग्स :TennisटेनिसNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिच