IPL 2022 Salaries: Rohit Sharma, लोकेश राहुल ६० दिवसांत जेवढा पगार घेणार तेवढा भारताच्या या पठ्ठ्याने ४ दिवसात घेतला, इतिहास रचला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 12:26 IST
1 / 8IPL 2022 Salaries: आयपीएल म्हटलं की खेळाडूंवर पडणारा पैशांचा पाऊस डोळ्यासमोर उभा राहतो.. आता कुठे आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झालेल्या इशान किशनने ( Ishan Kishan) आयपीएल २०२०च्या मेगा ऑक्शनमध्ये सर्वाधिक १५.२५ कोटी कमावले. 2 / 8मुंबई इंडियन्सने रोहित शर्मालाही ( Rohit Sharma) ऑक्शनमध्ये एवढा पगार एका पर्वासाठी आतापर्यंत दिला नव्हता. लखनौ सुपर जायंट्सने कर्णधार लोकेश राहुलला ( KL Rahul) १७ कोटींमध्ये करारबद्ध केले आणि आयपीएल २०२२मधील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 3 / 8पण, रक्कम या खेळाडूंना आयपीएलच्या एका पर्वातील १६-१७ सामने खेळल्यानंतर मिळणार आहे. मात्र, भारताच्या एका खेळाडूने एका दिवसांत एवढी मोठी रक्कम कमावली आणि या आयपीएल स्टार्सची मान शरमेनं खाली गेली.4 / 8भारताचा गोल्फपटू अनिर्बन लाहिरी ( Golfer Anirban Lahiri) याने भारतीय क्रीडा विश्वात विक्रम रचला. फ्लोरिडा येथे पार पडलेल्या चॅम्पियनशीप स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या लाहिरीने १६.७ कोटींची बक्षिस रक्कम ४ दिवसांत कमावली. 5 / 8आता याची तुलना जर आयपीएलमध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्या खेळाडू लोकेश राहुल ( १७ कोटी) व इशान किशन ( १५.२५ कोटी) यांच्याशी करायची झाल्यास ६० दिवस घाम गाळल्यानंतर क्रिकेटपटूंना हा पगार मिळणार आहे 6 / 8अनिर्बन लाहिरी हा एका स्पर्धेत सर्वाधिक बक्षिस रक्कम कमावणारा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी भारताच्या एकाही खेळाडूला एवढी मोठी बक्षिस रक्कम कमावता आलेली नाही. 7 / 8फ्लोरिडा येथील स्पर्धेत लाहिरीने २.१८ मिलियन डॉलरचा चेक हाती घेतला. ७ वर्षांपूर्वी लाहिरीने PGA Tour स्पर्धा जिंकली होती. अन् आजच्या या उपविजेतेपदाने त्याने कारकीर्दित कमावलेली सर्वाधिक रक्कम ठरली. 8 / 8आयपीएल २०२२ त सर्वाधिक पगार घेणारे खेळाडू - लोकेश राहुल ( लखनौ सुपर जायंट्स) १७ कोटी, रिषभ पंत ( दिल्ली कॅपिटल्स) १६ कोटी, रोहित शर्मा ( मुंबई इंडियन्स) १६ कोटी), रवींद्र जडेजा ( चेन्नई सुपर किंग्स) १६ कोटी, इशान किशन ( मुंबई इंडियन्स) १५.२५ कोटी) .