ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 14:21 IST
1 / 13पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय शिलेदारांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. भारताने यावेळी सहा पदके जिंकली. पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चमक दाखवत भरपूर पदकांची कमाई केली. 2 / 13२७ सप्टेंबर रोजी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडू अँटिलिया या अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानी आयोजित रेड कार्पेट कार्यक्रमात पोहोचले. 3 / 13रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांनी 'युनायटेड इन ट्रायम्फ' या कार्यक्रमात भारताच्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा गौरव केला. नीता अंबानी यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात १४० खेळाडूंचे अभिनंदन केले. 4 / 13आयओसी सदस्य असलेल्या नीता अंबानी यांच्यासह ऑलिम्पिक पदक विजेते मनू भाकर आणि नीरज चोप्रा आणि पॅरालिम्पिक पदक विजेते नवदीप सिंग आणि मोना अग्रवाल रविवारी मुंबईतील अँटिलिया येथे उपस्थित होते.5 / 13नीता अंबानी यांनी ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सन्मान केला. मनू भाकरसोबत कांस्य पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगचाही सत्कार करण्यात आला. 6 / 13नीता अंबानी यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या विशेष पुरस्कार समारंभात नेमबाजीत कांस्य पदक जिंकणारी भारतीय पॅरालिम्पिक पदक विजेती मोना अग्रवालचा गौरव केला.7 / 13तसेच नीता अंबानी यांनी युनायटेड इन ट्रायम्फ इव्हेंटमध्ये नेमबाजीत दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिचाही गौरव केला.8 / 13युनायटेड इन ट्रायम्फ सोहळ्याची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.9 / 13नीता अंबानी बॅडमिंटन पॅरालिम्पिक पदक विजेत्या नित्या श्री सिवनचा सन्मान करताना दिसल्या.10 / 13याशिवाय नीता अंबानी या भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि बॉलिवूड स्टार रणवीर सिंग यांच्यासोबत सेल्फी घेताना दिसत आहेत.11 / 13पॅरालिम्पिक स्टार यांना राधिका मर्चंटसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. अनेकांनी अंबानी कुटुंबातील सदस्यांसोबत फोटो काढले.12 / 13फोटोंमध्ये नीता अंबानी, मुकेश अंबानी, राधिका मर्चंट, आनंद पिरामल, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी हे दिसत आहेत.13 / 13फोटोंमध्ये नीता अंबानी, मुकेश अंबानी, राधिका मर्चंट, आनंद पिरामल, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी हे दिसत आहेत.