शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sania Mirza: अल्लाह बुरी नजर से बचाए मेरी जान को; सानिया मिर्झाची आई भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 16:07 IST

1 / 10
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक विभक्त झाले आहेत. सानियाशी घटस्फोट घेऊन मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले आहे. खरं तर शोएबने तिसरे लग्न केले आहे.
2 / 10
शोएबची तिसरी पत्नी सना जावेद हिचे देखील या आधी लग्न झाले आहे. सना तिच्या पडद्यावरील आयुष्याशिवाय वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
3 / 10
घटस्फोटानंतर सानिया मिर्झा कधीही उघडपणे काहीच बोलली नाही. मात्र, ती सोशल मीडियावर सक्रिय असून वेगवेगळ्या पोस्ट करत आहे.
4 / 10
सानियाने केलेल्या एक पोस्टवर तिची आई नसीमा मिर्झा यांनी भावनिक कमेंट केली आहे. 'अल्लाह बुरी नजर से बचाए मेरी जान को', असे नसीमा मिर्झा यांनी म्हटले.
5 / 10
शोएबची पत्नी सनाचा जन्म २५ मार्च १९९३ रोजी सौदी अरेबिया येथे झाला. कराची विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर तिने २०१२ साली 'शहर-ए-झात' मधून पाकिस्तानी सिनेसृष्टीत पदार्पण केले. काला दोरीया, मुश्त-ए-खाक, डंक, रूसवाई, दार खुदा, आणि इंतजार सारख्या नाटकांमध्ये तिने कमालीची भूमिका साकारली आहे.
6 / 10
सनाचे हे पहिले लग्न नसून तिचे याआधीही लग्न झाले आहे. २०२० साली उमैर जसवालसोबत सनाने निकाह केला होता. उमैर हा पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक आहे.
7 / 10
दरम्यान, पाच महिने डेट केल्यानंतर शोएब आणि सानिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दोघांनी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते.
8 / 10
शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता. तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडलं होतं. १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये ग्रँड पद्धतीने त्यांचं लग्न पार पडलं होतं. लग्नानंतर त्यांचे रिसेप्शन सियालकोटमध्ये झाले होते.
9 / 10
लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक असे आहे. पण, कोरोना काळानंतर दोघांमधील नात्यात दुरावा आला. मग घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आणि चर्चांवर अखेर पडदा पडला.
10 / 10
लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक असे आहे. पण, कोरोना काळानंतर दोघांमधील नात्यात दुरावा आला. मग घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आणि चर्चांवर अखेर पडदा पडला.
टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाShoaib Malikशोएब मलिकTennisटेनिसPakistanपाकिस्तानDivorceघटस्फोट