By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 16:44 IST
1 / 9Kylian Mbappe Transgender GF Ines Rau: कतार येथे झालेल्या FIFA World Cup 2022 Final मध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा चुरशीच्या सामन्यात पराभव केला. मेस्सीने अर्जेंटिनासाठी २ गोल केले, तर फान्सच्या कायलिन एम्बाप्पेने गोलची हॅट्ट्रिक करून साऱ्यांनाच चकित केले. 2 / 9फ्रान्सचा सुपरस्टार एम्बाप्पे याने फायनलमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध हॅटट्रिक केली, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पण असे असले तरी तो सर्वाधिक ८ गोल करत गोल्डन बूट जिंकण्यात यशस्वी ठरला.3 / 9पण सध्या एम्बाप्पेची खेळातील किर्ती जगभर पसरली असली तरी यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याची आणि ट्रान्सजेंडर मॉडेल इनेस राऊसोबतच्या नात्याचीही चर्चा सुरू झाली आहे.4 / 9इनेस राऊ ही प्लेबॉय कव्हरवर दिसणारी पहिली ट्रान्सजेंडर मॉडेल आहे. फ्रेंच मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार एम्बाप्पे राऊला डेट करत आहे.5 / 9कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ दरम्यान, फुटबॉलर एम्बाप्पे त्याची गर्लफ्रेंड इनेस राऊसोबत बीचवर दिसला होता. समुद्रकिनाऱ्यावर, किलियन एम्बाप्पेने इनेस राऊला आपल्या दोन्ही हाताने उचलून घेत होता. तेव्हाच त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली.6 / 9एम्बाप्पे आणि राऊ हे दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. काही काळापूर्वी दोघेही एका यॉर्टवर मस्ती करताना दिसले होते. तिथे एम्बाप्पे आणि राऊ दोघे अतिशय रोमँटिक अंदाजात होते. त्यांचा तो फोटो व्हायरलही झाला होता.7 / 9राऊ ही ३२ वर्षांची आहे. सुरूवातीला तो मुलगा म्हणून जन्माला आला होता आणि त्याचे नाव मारिओ होते. परंतु वयाच्या १६ व्या वर्षी मारिओने लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून घेतली आणि इनेस राऊ झाली.8 / 9नोव्हेंबर २०१७ मध्ये Playboy नावाच्या प्रसिद्ध अडल्ट मॅगझिच्या कव्हर पेजवर ती दिसली. त्यानंतर राऊ प्रसिद्धीझोतात आली. मेन्स मॅगझिनवर दिसणारी ती पहिली ट्रान्सजेंडर महिला मॉडेल होती.9 / 9अद्याप फुटबॉलपटू कायलिन एम्बाप्पे किंवा इनेस राऊ या दोघांनीही ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे उघडपणे जाहीर केलेले नाही.