1 / 9दोहा डायमंड लीग स्पर्धेत दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि भारताच्या गोल्डन बॉय नीरज चोप्रानं ९०.२३ मीटर लांब भाला फेकून नवा इतिहास रचला. 2 / 9भालाफेक क्रीडा प्रकारात ९० मीटर पेक्षा अधिक लांब भाला फेकणारा तो भारताचा पहिला अन् आशियातील तिसरा भालाफेकपटू ठरला आहे. दोहा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केल्यावरही नीरज चोप्राला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कारण जर्मनीच्या ज्युलियन वेबर याने ९१.०६ मीटर लांब अंतरावर भाला फेकत भारतीय ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडूला मागे टाकले. 3 / 9इथं एक नजर टाकुयात नीरजसह ९० मीटर पेक्षा अधिक लांब भाला फेकणाऱ्या भालाफेकपटूंच्या खास रेकॉर्ड्सवर 4 / 9आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक लांब भाला फेकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत झेक प्रजासत्ताकचा जॅन झेलेझनी अव्वलस्थानी आहे. त्याने ९८.४८ मीटर अंतर भाला फेकत वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 5 / 9त्याच्या पाठोपाठ जर्मनचा ओहान्स वेटर (९७.७६ मी.) आणि थॉमस रोहलर (९३.९० मी.) फिनलँडचा अकी परव्हिएनेन (९३.०९ मी.) आणि जर्मनचा अँडरसन पीटर्स (९३.०३ मी) आघाडीच्या पाचमध्ये आहेत. 6 / 9पाकिस्तानच्या अर्शद नदीमसह (९२.९७ मी.) केनियाचा ज्युलियस येगो (९२.७२ मीटर), रशियाचा सेर्गेई मकारोव (९२.६१ मी.), जर्मनीचा रेमंड हेच (९२.६ मी.) आणि अँड्रियास हॉफमन (९२.०६) हे भालाफेकपटू आघाडीच्या १० मध्ये असल्याचे दिसून येते. 7 / 9जर्मनीचा कॉन्स्टँटिनोस गॅटसिओडिस (९१.६९ मी.), नॉर्वेचा अँड्रियास थोरकिल्डसेन (९१.५९ मी), फिनलँडता टेरो पिटकामकी (९१.५३ मी), ग्रेट ब्रिटनचा स्टीफन जेम्स बॅकले (९१.४६) तैवानचा चेंग चाओ-त्सन (९१.३६ मी.), अमेरिकन ब्रॉक्स ग्रीर (९१.२९ मी.) जर्मनचा ज्युलियन वेबर (९१.०६ मी.), झेक प्रजासत्ताकचा जाकुब वडलेजच (९०.८८ मी.) फिनलँडचा किम्मो किनुनेन (९०.८२ मी.) आणि लॅटिनचा वादिम्स वासिलेव्स्किस (९०.७३ मी.) हे खेळाडू टॉप २० मध्ये आहेत. 8 / 9एस्टोनियन मॅग्नस किर्ट (९०.६१), फिनलँडचा सेप्पो रॅटी (९०.६ मी.), जर्मनीचा बोरिस हेन्री (९०.४४ मी.) भारताचा नीरज चोप्रा (९०.२३ मी.), जर्मनीचा डेहनिंग (९०.२ मी) आणि त्रिनबॅगोनियन केशॉर्न वॉलकॉट (९०.१६ मी.) हे सहाजण अनुक्रमे २१ ते २६ रँकसह ९० मीटर पेक्षा लांब अंतरावर भालाफेक णाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहेत. 9 / 9आतापर्यंत फक्त २६ खेळाडूंनी भालाफेक प्रकारात ९० मीटर पेक्षा अधिक लांब भालाफेकला आहे. या खेळाडूंच्या यादीत भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा हा २४ व्या स्थानावर आहे.