शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्हाला माहितीये का? टेनिस कोर्टवरील या सुंदरीला 'द टायगर' नावानं ओळखलं जातं; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 17:53 IST

1 / 9
टेनिस जगतातील नंबर महिला टेनिसपटू आर्यना संबालेंका ही कोर्टवरील आपल्या सर्वोत्तम कामगिरीशिवाय सौंदर्यामुळं चर्चेत राहणाऱ्या महिला खेळाडूंपैकी एक आहे.
2 / 9
बेलारुसची नंबर वन महिला टेनिसपटूनं अमेरिकन ओपन स्पर्धेतील महिला एकेरीत आपल्या कामगिरीतील सातत्य दाखवून देत फायनल गाठली आहे. वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेतेपद पटकावण्यासाठी ती अमेरिकेच्या अमांडा अनीसिमोवाविरुद्ध भिडताना दिसेल.
3 / 9
२७ वर्षीय आर्यना सबालेंका हिने आतापर्यंत आपल्या टेनिस कारकिर्दीत २ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत अमांडाकडून सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यालर तिने काही काळ ब्रेक घेतला होता. आता या पराभवाची परतफेड करण्यासाठी ती कोर्टवर उतरेल.
4 / 9
आर्यना सबालेंकाचा जन्म १९९८ मध्ये बेलारूस येथील मिंस्क येथे झाला, तिचे वडील एक आइस हॉकी प्लेयर होते. २०१३ मध्ये या सुंदरीनं टेनिस कोर्टवरील आपल्या प्रवासाची सुरुवात केली.
5 / 9
बेलारूसची टेनिस कोर्टवरील सुंदरी भटकंतीची शौकीन आहे. खेळातील कामगिरीशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून ती हॉट अँण्ड ब्यूटीफूल चाहत्यांना घायाळ करत असते.
6 / 9
सोशल मीडियावरील लोकप्रिय माध्यम असलेल्या इन्स्टाग्रामवर तिने ३४ लाख फॉलोअर्स कमावले आहेत. तिच्या प्रत्येक फोटो अन् व्हिडिओवर चाहते प्रेमाची 'बरसात' करत असतात.
7 / 9
वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी या नंबर वनट महिला टेनिसपटून खेळातील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर बक्षीस स्वरुपात मिळालेली रक्कम आणि जाहिरातीच्या माध्यमातून जवळपास १४० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
8 / 9
आर्यना संबालेंकाच्या डाव्या हातावर वाघाचा टॅटू आहे. यामुळे तिला 'द टायगर' हे टोपणनाव मिळाले असून ति स्वतःलाही या नावाने संबोधले आहे.
9 / 9
सेरेना विलियम्स आणि मारिया शारापोव्हा यांना आदर्श मानणाऱ्या टेनिस स्टारमध्ये खेळात सेरेनासारखा धाक तर लूक्समध्ये शारापोव्हाची बात दिसून येते.
टॅग्स :Tennisटेनिस