शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award : 'श्री सदस्यां'चा जनसागर! आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सन्मान सोहळ्याला अलोट गर्दी, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 9:20 AM

1 / 6
Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. खारघरमध्ये भव्यदिव्य कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे.
2 / 6
नवी मुंबईतील खारघरमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास हा सोहळा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित असणार आहे. त्याशिवाय मोठा जनसमुदायही उपस्थित आहे.
3 / 6
पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सन्मान सोहळ्यासाठी संपूर्ण कोकणातील लाखो श्री सदस्य मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे कोकवासियांचं मनं जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सोहळा याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी मोठा जनसागर खारघरच्या मैदानावर लोटला आहे.
4 / 6
बेस्टकडून 500, ठाणे 350, नवी मुंबई 200 बसेस आल्या आहेत यांना विविध रेल्वे स्टेशनवर ठेवण्यात येईल, 1350 स्टाफ ठेवण्यात आला आहे, मेकॅनिकल टीम ठेवण्यात आल्या आहेत. बेस्टकडून 500, ठाणे 350, नवी मुंबई 200 बसेस आल्या आहेत यांना विविध रेल्वे स्टेशनवर ठेवण्यात येईल, 1350 स्टाफ ठेवण्यात आला आहे, मेकॅनिकल टीम ठेवण्यात आल्या आहेत.
5 / 6
सोहळ्याच्या ठिकाणी श्री भक्तांसाठी 10 हजार टॉयलेट्स उभारण्यात आले आहेत. लोकांच्या वस्तू हरवल्या तर त्यासाठी लॉस्ट अँड फाऊंड अॅप तयार करण्यात आलंय. गर्दीचे नियोजन करण्यासाठी पासेस वर क्यू आर कोड देण्यात आले आहेत, कोणी कुठे बसायचे यासाठी आधीच नियोजन करण्यात आलं आहे.
6 / 6
गर्दीमुळे लोकांच्या मोबाईल रेंज नसेल त्यासाठी 13 विविध कंपनीचे टॉवर उभारण्यात आले आहेत. पाण्याची व्यवस्था म्हणून सिडकोने पाईप लाईन टाकून 12 नळ मैदानात दिले आहेत. 500 छोटे फायर एक्सिंगविशर, 8 क्विक रिस्पॉन्स टीम तैनात आहेत. 70 अँब्युलन्स, त्यात 16 कार्डीयक आहेत, एक छोटे हॉस्पिटल देखील उभारण्यात आले आहे. 5 हॉस्पिटल आहेत त्यात प्रत्येक हॉस्पिटल मध्ये 100 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस