1 / 11देशभरात कोरोनाचं संकट उभं टाकलं असताना दुसऱ्या लाटेत कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेचं उदाहरण पाहायला मिळालं. देशातील अनेक राज्यांत एकसारखीच विदारक परिस्थिती होती. 2 / 11मध्य प्रदेशमध्येही कोरोना रुग्णसंख्या वाढली असून रुग्णव्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. त्यातच, कोरोना चाचणीसंदर्भातील खासदाराच एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांना संताप व्यक्त केलाय. 3 / 11कोरोना चाचणीनंतर पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी आरोग्य व्यवस्था चाचण्या कमी करत असल्याचं या संवादातून पुढे आलं आहे. 4 / 11भरतपूरचे खासदार रंजीता कोळी यांनी सोमवारी नतबाई आरोग्य केंद्राचवर जाऊन निरीक्षण केलं. यावेळी, आरोग्य अधिकारी डॉ. पवन गुप्ता यांनी राज्य सरकारच्या कामाची पोलखोल केली. 5 / 11डॉ. पवन गुप्ता आणि खासदार रंजिता कोळी यांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावरुन, सरकार आणि आरोग्य विभागात चांगलाच सामना रंगला आहे. 6 / 11वरिष्ठ आरोग्य अधिकारी कप्तान सिंह यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर डॉ. पवन गुप्ता यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. 7 / 11खासदार रंजिता कोळी जेव्हा आरोग्य केंद्रावर निरीक्षणासाठी पोहोचल्या होत्या. त्यावेळी, एका रुग्णाने आपली कोरोना चाचणी होत असल्याचं सांगितलं. 8 / 11रुग्णाच्या तक्रीरीनंतर आरोग्य अधिकारी डॉ. पवन गुप्ता यांना खासदार कोळी यांनी विचारणा केली. त्यावेळी, राज्य सरकारने कोरोना चाचणी बंद केल्याचं गुप्ता म्हणाले. 9 / 11जर जास्त कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत असतील, तर कोरोना चाचणी कमी करण्याचे सांगण्यात येते, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितलं. 10 / 11डॉ. गुप्ता यांच्याया उत्तराने खासदार कोळी संतापल्या, तसेच या प्रकारामुळे खरी आकडेवारी लवपून सरकार जनतेसोबत धोकाबाजी करत असल्याचं कोळी यांनी म्हटलं. तसेच, यामुळे कोरोना पसरला तर कोण जबाबदार असा सवालही त्यांनी विचारला. 11 / 11खासदार आणि डॉ. गुप्ता यांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर, डॉ. गुप्ता यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.