शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:07 IST

1 / 7
Who is Nikhil Sosale: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)ने अठरा वर्षांनंतर IPL ची ट्रॉफी आपल्या नावावर केली. च्या विजयानंतर बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण, यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यात ११ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आरसीबीचा मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाले याला अटक केली आहे.
2 / 7
निखिल सोसालेवर विजयी मिरवणुकीच्या कार्यक्रमाचे योग्य नियोजन न केल्याचा आरोप आहे. त्याच्यासोबत डीएनए या इव्हेंट कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा दुःखद अपघात झाला, हे शोधण्यासाठी पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. निखिल सोसाले मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न असताना विमानतळावर अटक करण्यात आली.
3 / 7
निखिल सोसाले कोण आहे? निखिल सोसाले आयपीएल २०२५ च्या सर्वच सामन्यांमध्ये विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासोबत गॅलरीत बसलेला दिसायचा. बेंगळुरू चॅम्पियन बनला, तेव्हादेखील निखिल अनुष्का शर्मासोबत मैदानावर दिसला होता. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा व्यतिरिक्त, निखिलला इंस्टाग्रामवर साक्षी धोनी, युजवेंद्र चहल, दीपिका पल्लीकल, ट्रॅव्हिस हेड, झहीर खान, हेजल कीच, फाफ डू प्लेसिस, सुरेश रैना असे अनेक मोठे पॉवर स्टार फॉलो करतात.
4 / 7
त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार त्याचा जन्म १८ ऑगस्ट १९८६ रोजी झाला. तो गेल्या दोन वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चा मार्केटिंग आणि महसूल प्रमुख आहे. सोसाले हा प्रत्यक्षात १३ वर्षांपासून DIAGEO इंडियामध्ये काम करतो. हे युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) चालवते. USL ही RCB ची मूळ कंपनी आहे.
5 / 7
RCB पूर्वी विजय मल्ल्याच्या मालकीची होती, परंतु मल्ल्याने देश सोडून पळून गेल्यानंतर USL ने संघाची संपूर्ण जबाबदारी घेतली. निखिल यापूर्वी RCB मध्ये व्यवसाय भागीदारी प्रमुख होता. त्याने ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील जेम्स कुक विद्यापीठातून डबल मेजर पदवी प्राप्त केली आहे. त्याने RCB च्या ब्रँड स्ट्रॅटेजी आणि मार्केटिंगमध्ये प्रमुख भूमिका बजावली आहे.
6 / 7
या प्रकरणात आतापर्यंत काय झाले- इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात RCB पहिल्यांदाच चॅम्पियन बनला. ३ जून रोजी पंजाब किंग्ज (पीबीकेएस) ला ६ धावांनी पराभूत केले. या विजयाच्या एक दिवसानंतर, बंगळुरूमध्ये विजय परेड आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. या प्रकरणात आरसीबी व्यवस्थापन, कर्नाटक क्रिकेट राज्य संघटना (केएससीए) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने हात वर केले. नंतर ५ जून रोजी उच्च न्यायालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.
7 / 7
त्यानंतर ५ जून रोजी आरसीबी, डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स (जी या कार्यक्रमाची आयोजक कंपनी होती), कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए) आणि इतर अज्ञात लोकांविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलिसांना जबाबदार धरले आणि पोलिस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. कोर्टाने १० जूनपर्यंत संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागितला आहे.
टॅग्स :Royal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरIPLआयपीएल २०२४StampedeचेंगराचेंगरीCrime Newsगुन्हेगारी