1 / 7कर्नाटकात भाजप नेत्याने मुस्लिम आयएएस अधिकारी फौजिया तरन्नुम यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. त्यांनी आयएएस फौजिया यांना पाकिस्तानी म्हटले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आयएएस अधिकारी तरन्नम सध्या कर्नाटकातील कलबुर्गीच्या डीसी म्हणजेच उपायुक्त आहेत.2 / 7फौजिया तरन्नुम या २०१४च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना यूपीएससीमध्ये ३१ वा रँक मिळाला आहे. सध्या त्या कलबुर्गी येथे तैनात आहेत. भाजप नेत्याने त्यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय गदारोळ उडाला आहे. दुसरीकडे, आयएएस असोसिएशननेही या विधानाचा निषेध केला आहे.3 / 7फौजिया तरन्नुम यांचा जन्म २ एप्रिल १९९२ रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे झाला. बंगळुरूमध्येच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि नंतर टीसीएसमध्ये विश्लेषक म्हणून काम केले. 4 / 7आयएएस फौजिया तरन्नुम यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण बेंगळुरू येथील बिशप कॉटन गर्ल्स हायस्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर, त्यांनी बेंगळुरूच्या ज्योती निवास कॉलेजमधून बी.कॉम केले. यानंतर, त्यांनी बंगळुरूच्या क्राइस्ट कॉलेजमधून फायनान्समध्ये एमबीए केले.5 / 7एका मुलाखतीत त्यांनी सांगितलेले की, २०१० मध्ये नोकरी सोडल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली होती. २०११ मध्ये त्या नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या. यात त्यांना ३०७वा रँक मिळाला आणि आयआरएस पद मिळाले.6 / 7२०१४ मध्ये, फौजिया तरन्नुम यांनी पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि ३१वी रँक मिळवली. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, आयआरएस म्हणून काम करताना त्यांना आयआरएस आणि आयएएसचे प्रोफाइल किती वेगळे आहेत हे जाणवले. यासाठी त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि ऑल इंडिया रँकसह परीक्षा उत्तीर्ण केली.7 / 7आयएएस फौजिया तरन्नुम यांना सार्वजनिक प्रशासनातील त्यांच्या चांगल्या कामाबद्दल या वर्षी जानेवारीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सन्मानित केले होते. हा पुरस्कार मिळालेल्या २२ अधिकाऱ्यांमध्ये त्या सामील होत्या.