पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका कोणता मोबाइल वापरतात?; एका फोटोमुळे रहस्य आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 14:52 IST
1 / 7पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता फोन वापरतात? हा प्रश्न अनेकवेळा लोकांच्या मनात येतो, पण त्याचे उत्तर निवडक लोकांकडेच असेल.2 / 7एका फोटोने हे रहस्य उघड केले आहे. युएईमध्ये सीओपी २८ चे परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील अनेक नेते उपस्थित आहेत.3 / 7या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे सेल्फी समोर आले आहेत. दोघांचे सेल्फी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.4 / 7एका फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात एक फोन दिसत आहे, जो निश्चितपणे अॅपलचा प्रीमियम हँडसेट आहे. हा पांढऱ्या रंगाचा फोन iPhone 15 Pro Max असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. 5 / 7iPhone 15 Pro Maxसह iPhone 14 Pro Max हा फोन देखील असल्याची शक्यता आहे. कारण दोघांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे दोघांमधील नेमका कोणता फोन नरेंद्र मोदी वापरतात याचा अंदाज लावणे कठीण आहे. मात्र iPhone 15 Pro Max किंवा iPhone 14 Pro Max यामधील एक मोबाईल नरेंद्र मोदी वापरतात हे नक्की झालं आहे.6 / 7 आयफोन 15 प्रो मॅक्स (white titanium) हा अॅपलचा सर्वात महागडा फोन आहे, ज्याची किंमत 1,59,900 रुपये आहे.7 / 71,59,900 या किंमतीत कंपनी 256GB स्टोरेज वेरिएंट ऑफर करते. त्याच्या 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,79,900 रुपये आहे, तर 1TB व्हेरिएंटची किंमत 1,99,900 रुपये आहे.