Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:56 IST
1 / 8अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या सुरुवातीच्या तपास अहवालाने एक मोठा धक्का दिला आहे. एआय-१७१ विमानाचे दोन्ही इंजिनला इंधन पुरवणारे स्विच बंद झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. यानंतर पायलट्समध्ये संभ्रम निर्माण झाला आणि अवघ्या काही सेकंदातच विमान कोसळले. नक्की हे इंधन पुरवठा स्विच कुठे असतात आणि ते कसे काम करतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.2 / 8विमानातील इंधन स्विचचे मुख्य काम इंजिनमध्ये तेल (इंधन) पोहोचवणे हे आहे. पायलट विमान जमिनीवर सुरू करताना किंवा बंद करताना या स्विचचा वापर करतात. याशिवाय, उड्डाणादरम्यान जर एखादे इंजिन काम करणे थांबले, तर पायलट या स्विचचा वापर करून दुसरे इंजिन सुरू करतात. 3 / 8फ्यूअल स्विच अशा प्रकारे डिझाइन केलेले असतात की, ते अचानक चालू किंवा बंद करता येत नाहीत. एवढेच नाही, तर इंधन स्विचसाठी वीजपुरवठाही वेगळा असतो. जर हे स्विच बंद झाले, तर इंजिन त्वरित बंद होते.4 / 8बोईंग ७८७ विमानात दोन इंधन नियंत्रण स्विच (Fuel Control Switches) थ्रस्ट लेव्हलच्या खाली असतात. त्यांना स्प्रिंग लावलेल्या असतात, जेणेकरून त्यांची स्थिती कायम राहते. या स्विचसाठी 'कटऑफ' आणि 'रन' असे दोन मोड असतात. 5 / 8इंजिन बंद करण्यासाठी किंवा चालू करण्यासाठी, पायलटाला आधी स्विच वर उचलावा लागतो. त्यानंतर त्याला 'रन' वरून 'कटऑफ' किंवा 'कटऑफ' वरून 'रन' स्थितीत आणावे लागते. उड्डाणादरम्यान हे स्विच बंद करणे अत्यंत धोकादायक असते.6 / 8अपघाताला बळी पडलेल्या विमानातून फ्लाइट रेकॉर्डर (ब्लॅक बॉक्स) जप्त करण्यात आला आहे. या फ्लाइट रेकॉर्डरनुसार, विमानांच्या दोन्ही इंजिनांचे स्विच काही सेकंदांच्या आत 'रन' वरून 'कटऑफ' मोडमध्ये टाकले गेले होते. याचा परिणाम असा झाला की, विमानांच्या इंजिनांची शक्ती कमी होऊ लागली. 7 / 8कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एक पायलट 'फ्यूअल स्विच का बंद केले?' असे बोलताना ऐकू येतोय. याला प्रत्युत्तर देताना दुसरा पायलट 'मी ते केले नाही' असे म्हणतो.8 / 8या अहवालाने अपघातामागे मानवी चूक असण्याची शक्यता बळावली आहे. पायलटांमध्ये नेमका काय संभ्रम निर्माण झाला, हे आता पुढील तपासात स्पष्ट होईल.