By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 20:28 IST
1 / 9राज्यातील राजकीय घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल ४० आमदार फोडून स्वतंत्रपणे गट स्थापन केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते रणनिती ठरवत आहेत. 2 / 9 आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातातून संपूर्ण शिवसेना पक्षच जाईल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे शिवसेनेच्या (Shivsena) तोंडाला अक्षरश: फेस आला आहे. 3 / 9या सगळ्यातून आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde)किंवा पडद्यामागून त्यांना भाजपचा मोठा पाठिंबा असल्याचे दिसून येते. तर, शरद पवार यांनी तसा आरोपही केला आहे. 4 / 9शिवसेनेवर ओढावलेल्या या बंडांतरामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधकांना उकळी फुटली आहे. नारायण राणेंसह काही दिवसांपूर्वी हनुमान चालिसा म्हणण्यावरुन चर्चेत असलेल्या राणा दाम्पत्यालाही कदाचित आनंद झाला आहे. 5 / 9मातोश्रीवर येऊन हनुमान चालीस म्हणण्याचा आग्रहामुळे शिवसेनेशी वैर ओढवून घेणाऱ्या नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा या दाम्पत्याला शिवसेनेने चांगलाच हिसका दाखवला होता. 6 / 9राणा दाम्पत्याविरोधात शिवसेनेने मुंबईत जोरदार आंदोलन केले होते. राणा विरुद्ध शिवसेना असा संघर्षही पेटला होता. त्यामुळे, राणा दाम्पत्यास उद्धव ठाकरेंवरील या संकटाचा आनंद होतो की काय, असे दिसून येते. 7 / 9उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेली साडेसाती आहेत. त्यांच्या काळात राज्याची पिछेहाट झाली असे, राणा दाम्पत्याने म्हटले होते. यानंतर राणा दाम्पत्याला तब्बल १४ दिवस तुरुंगात खितपत पडावे लागले होते. 8 / 9आता, राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेल्या द्रौपती मूर्म यांच्यासाठी राजधानी दिल्लीत नवनीत कौर आल्या होत्या. त्यावेळी, माध्यमांनी त्यांच्याकडे आगेकूच केली. मात्र, त्यांनी काहीही न बोलता केवळ इशाऱ्यातून आपला आनंद व्यक्त केला. 9 / 9पुष्पा चित्रपटातील मै झुकेगा नही साला... या सीनचा अभिनय त्यांनी करुन दाखवला. त्यांचा हा फोटो सध्या चर्चेत असून त्यांनी शिवसेनेतील बंडावरच ही कृती केल्याची चर्चा रंगली आहे.