1 / 9गेल्या १ महिन्याहून अधिक काळ रशिया-यूक्रेनमध्ये(Russia Ukraine War) युद्ध सुरू आहे. या युद्धात यूक्रेनच्या लष्काराला अब्जावधीची हत्यारं देऊन रशियन सैन्याविरोधात ताकद दिल्यानंतर अमेरिकेची नजर आता व्लादिमीर पुतिन यांच्या मित्रांवर आहे. 2 / 9रशिया-यूक्रेन युद्धात भारताने अद्याप कुठलीही ठोस भूमिका न घेता युद्ध थांबायला हवे असं वारंवार म्हटलं आहे. आता अमेरिका भारताला(India) लष्करी मदतीची पॅकेज देण्याची तयारी करत आहे. ज्यामुळे संरक्षण क्षेत्रातील संबंध आणखी घट्ट होतील. 3 / 9भारताला रशियाच्या शस्त्रावर निर्भर राहण्याची गरज भासू नये यासाठी अमेरिका(America) ५० कोटी डॉलर शस्त्र पुरवठा भारताला करण्याच्या तयारीत आहे. वृत्त संस्था ब्लूमबर्गनुसार, ५० कोटी डॉलर सैन्य पॅकेज अमेरिकेकडून भारताला मिळणार आहे. 4 / 9इस्त्राइल, मिस्त्रनंतर लष्करी मदत मिळणारा भारत तिसरा मोठा देश ठरेल. परंतु ही अधिकृत घोषणा कधी होईल आणि या पॅकेजमध्ये कुठल्या शस्त्रांचा समावेश असेल याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. अमेरिकेचे हे पाऊल राष्ट्रपती ज्यो बायडन यांच्याकडून भारताला दिर्घकालीन सुरक्षा सहकारी बनवण्याचा प्रयत्नांचा एक भाग आहे असं अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 5 / 9आवश्यक ती सर्व शस्त्र देण्याची तयारी आहे. अमेरिकेचे अधिकारी म्हणाले की, भारताने यूक्रेन युद्धात रशियावर कुठलीही टीका केली नाही. त्यानंतरही अमेरिका शस्त्र पुरवठा करणार आहे. भारताच्या प्रत्येक क्षेत्रात एक विश्वसनीय सहकारी बनण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. 6 / 9भारतासोबतच अमेरिका फ्रान्ससोबत मिळूनही काम करणार आहे. जेणेकरून भारत सरकारला आवश्यक त्या प्रत्येक शस्त्राचा पुरवठा करता येईल. भारताने याआधीच शस्त्रसाठ्यासाठी रशियावरील निर्भरता कमी करण्याचा प्रयत्न वेगाने सुरू केला आहे त्यात अमेरिकेची ही ऑफर आणखी गती देण्याची शक्यता आहे. 7 / 9भारताला कुठल्याही प्रकारे मोठे आणि घातक शस्त्रांचा पुरवठा होईल. त्यात फायटर जेट, नौदलाच्या युद्धनौका, लष्करी टँकचा समावेश आहे.भारताची गरज पूर्ण करण्याचं मोठं आव्हान अमेरिकेसमोर आहे. अमेरिकेची ५० कोटी डॉलर शस्त्राची ऑफर ही प्राथमिक स्वरुपात आहे. 8 / 9परंतु भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. भारत रशियाचा सर्वात मोठा शस्त्र खरेदीदार आहे. मागील एक दशकांत भारताने अमेरिकेकडून ४ अरब डॉलरची शस्त्रे खरेदी केली. तर रशियाकडून २५ अरब डॉलरची खरेदी झाली. 9 / 9चीन आणि पाकिस्तानशी लढण्यासाठी भारत रशियाच्या हत्यारांवर निर्भर आहे. अमेरिका यावरून भारतावर नाराज होती. परंतु त्यांना भारताची समस्या आता कळाली आहे. इतकेच नाही चीनचा सामना करण्यासाठी आता उघडपणे अमेरिका भारताची बाजू घेत आहे.