शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दुर्दैवाने जी-2०मध्ये अप्रिय घटना घडलीच तर...! हॉटेलांमध्ये फुल्ली लोडेड शस्त्रे, अशी ठेवलीय सुरक्षा व्यवस्था की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 14:20 IST

1 / 7
जी-२० च्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांच्या शक्यता पडताळून पाहिल्या गेल्या आहेत. जर हल्ला झालाच तर बॅकअप प्लॅनही तयार करण्यात आला आहे. तीन दिवसांसाठी दिल्लीत ९ देशांचे प्रमुख नेते आणि १०० हून अधिक पाहुणे येणार आहेत. या काळात काही घडलेच तर देशाची प्रतिमा मलिन होऊ शकते, यामुळे या सर्व शक्यता विचारात घेतल्या जात आहेत. यानुसार तयारी केली जात आहे.
2 / 7
दहशतवादी हल्ला झालाच तर सुरक्षा रक्षकांना शस्त्रास्त्रांची कमतरता भासू नये यासाठी हे व्हीआयपी ज्या हॉटेलांमध्ये उतरणार आहेत तिथे फुल लोडेड शस्त्रे ठेवण्यात आली आहेत.
3 / 7
एवढेच नाही तर एखाद्या ह़ॉलिवूडच्या फिल्ममध्ये वापरतात ती स्मोक ग्रेनेड, औषधे आणि इतर बॅकअप शस्त्रास्त्रे तयार ठेवण्यात आली आहेत. वायरलेस सेट बंद होऊ नये म्हणून त्याचे चार्जर, बॅटरी आदी गोष्टी देखील ठेवली आहेत.
4 / 7
डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली शस्त्रास्त्रे तयार ठेवण्यात आली आहेत. ही तयारी गेल्या काही दिवसांपासून नाही तर काही महिन्यांपासून सुरु आहे. यावेळी अमेरिकेसारख्या देशांच्या सुरक्षा व्यवस्थेशीही सल्लामसलत करण्यात आली आहे.
5 / 7
जर दुर्दैवाने दहशतवादी हल्ला सफल झालाच तर सुरक्षा रक्षकांना तातडीने शस्त्रे मिळावीत, त्याच्या पुरवठ्यामध्ये कोणताही अडथळ येऊ नये यासाठी ही तयारी करण्यात आली आहे.
6 / 7
दिल्लीत प्रगती मैदान ते पंतप्रधान निवासाच्या परिसराला नो फ्लाईंग झोनमध्ये टाकण्यात आले आहे. कोणतीही वस्तू एनडीएमसी परिसरात उडाली तर ती पाडली जाणार आहेत. यासाठी अँटी ड्रोन यंत्रणा बसवण्यात आली आहे.
7 / 7
हॉटेलांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात आहे. व्हीव्हीआयपी पाहुण्यांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनेकदा व्हेरिफिकेशन करण्यात आले आहे. हा स्टाफ एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरवर देखील जाऊ शकणार नाहीय, अशी कार्ड यंत्रणा बसविण्यात आली आहे.
टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदTerror Attackदहशतवादी हल्ला