शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टिकटॉक बंदीवरून TMC खासदार नुसरत जहाँ यांचा मोदी सरकारला सवाल, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 1:08 PM

1 / 10
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत चीनला आर्थिक आघाडीवर धक्का देत आहे. गेल्या सोमवारी म्हणजेच 29 जून रोजी भारताने टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातल्याचे जाहीर केले.
2 / 10
टिकटॉकसह चिनी अॅप्सवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावरून लोक आणि सेलेब्रिटींकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यातच तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी मोदी सरकारकडे प्रश्न उपस्थित केले आहेत.
3 / 10
नुसरत जहाँ म्हणाल्या, 'टिकटॉक हे एक मनोरंजन करणार अ‍ॅप आहे. हा एक भावनेच्या भरात घेतलेला निर्णय आहे. धोरणात्मक योजना काय आहे? यामुळे बेरोजगार होणाऱ्या लोकांचे काय?'
4 / 10
याचबरोबर, 'नोटबंदीसारखंच लोक त्रासून जातील. ही बंदी राष्ट्रीय सुरक्षेसाठी आहे, त्यामुळे मला त्याच्याशी काही घेणेदेणे नाही. पण, निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तर कोण देणार?,'असा सवाल नुसरत जहाँ यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
5 / 10
भारतीय गुप्तचर यंत्रणांनी काही दिवसांपूर्वीच काही धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
6 / 10
59 चिनी अॅप्समध्ये लोकप्रिय असलेले टिकटॉक, यूसी ब्राउझर, झेंडर, शेअर इट, क्लीन मास्टर यांसारख्या अनेक अॅप्सचा समावेश आहे..
7 / 10
भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचे हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69अ च्या अधिकाराचा वापर करत निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
8 / 10
त्याचबरोबर, 130 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने 59 मोबाइल अ‍ॅपवर बंदी घातली आहे, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. मात्र, केंद्र सरकारने या निर्णायावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
9 / 10
दरम्यान, नुसरत जँहा एक प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या वतीने त्यांनी बशीरहाट येथून निवडणूक लढविली आणि विजय मिळविला.
10 / 10
सर्व फोटो नुसरत जँहा यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घेतले आहेत.
टॅग्स :nusrat jahanनुसरत जहाँChinese Appsचिनी ऍपTik Tok Appटिक-टॉक