शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gauhar Jaan Google Doodle : पहिल्या रेकॉर्डिंग सुपरस्टार गौहर जान यांच्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 1:16 PM

1 / 5
भारतातील पहिल्या 'रेकॉर्डिंग सुपरस्टार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौहर जान यांची आज 145वी जयंती आहे. यानिमित्तानं गुगलने खास डुडल साकारत त्यांना आदरांजली वाहिली आहे. 26 जून 1873 साली त्यांचा उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यात जन्म झाला होता. आपल्या गाण्यांचं ध्वनीमुद्रण करणारी भारतातील पहिला गायिका, अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या या रेकॉर्डचा खुलासा 'द ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया'नं केला होता.
2 / 5
गौहर जान यांचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. त्याचं खरे नाव एंजलिना योवर्ड असे होते. दरम्यान, गौहर यांची आईदेखील एक प्रशिक्षित नृत्यांगना आणि गायिका होत्या.
3 / 5
गौहर जान यांनी आपल्या आईकडून नृत्य आणि गायनाचे धडे घेतले. त्यांनी जवळपास 20 भाषांमध्ये ठुमरीपासून भजनांपर्यंत प्रत्येक प्रकारची गाणी गायली होती. त्या काळातील सर्वांत महागड्या गायिका म्हणून त्यांची ख्याती होती.
4 / 5
वयाच्या 13 व्या वर्षी गौहर जान यांचे लैंगिक शोषण झाले होते.
5 / 5
आपल्या कारकिर्दीत गौहर जान यांनी जवळपास 600 गाण्यांचं ध्वनीमुद्रण केले होते. विशेष म्हणजे आपल्या प्रत्येक रेकॉर्डिंग्सच्या वेळेस त्या नवीन कपडे आणि दागिने परिधान करुन यायच्या. कारर्कीदीच्या सुरुवातीलाच त्या कोट्यधीश झाल्या होत्या.
टॅग्स :googleगुगलDoodleडूडल