शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण शरीरावर गोंदवून घेतात रामाचं नाव, स्वत:ला म्हणवतात रामनामी, अशी आहे या जमातीची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 09:48 IST

1 / 7
अयोध्येमध्ये तब्बल ५५० वर्षांनंतर श्रीराम त्यांच्या जन्मस्थानी विराजमान होणार आहेत. यादरम्यान भगवान श्रीरामांच्या भक्तिबाबत वेगवेगळ्या कथा कहाण्या समोर येत आहेत. त्यामध्ये रामनामी जमातीची खूप चर्चा होत आहे. रामनामी जमातीचे लोक त्यांच्या संपूर्ण शरीरावर रामाचं नाव गोंदवून घेतात. रामनामी जमातीबाबत खास माहिती पुढीलप्रमाणे.
2 / 7
रामनामी जमातीचे लोक केवळ हात किंवा तोंडावरच नाही तर संपूर्ण शरीरावर रामाचं नाव गोंदवून घेतात. त्यामुळे संपूर्ण जीवनभर रामाचं नाव त्यांच्यासोबत राहते. रामनामी एकप्रकारे आपलं संपूर्ण शरीर श्रीरामांना समर्पित करतात.
3 / 7
या जमातीमधील लोकांनी १८९० च्या दशकात आपल्या शरीरावर रामाचं नाव लिहायला सुरुवात केली होती. रामनामी जमातीच्या स्थापनेचं श्रेय परशूराम यांना जातं. रामनामी जमातीचे लोक श्रीरामावर अतूट श्रद्धा ठेवतात. भारतामध्ये रामनामी जमातीचे सुमारे एक लाख लोक आहेत.
4 / 7
मात्र रामनामी जमातीचे लोक भारतामध्ये कुठे कुठे राहतात याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही आहे. मात्र ते छत्तीसगडमधील महानदीच्या किनाऱ्यावर वसले आहेत. त्याशिवाय रामनामी जमातीचे काही लोक ओदिशा आणि महाराष्ट्रामध्येही आहेत.
5 / 7
रामनामी जमातीच्या लोकांच्या पेहरावाचा विचार केल्यास हे लोक संपूर्ण शरीरावर रामाचं नाव गोंदवून घेतात. तसेच रामनाम असलेली शाल लपेटून घेतात. त्याशिवाय ते मोरपंख असलेला मुकुटही परिधान करतात.
6 / 7
रामनामी जमातीच्या शरीरावर रामनाम गोंदवून घेण्यामागची कहाणी खूप रंजक आहे. मिळालेल्या माहितीनुसार परशुराम यांनी त्यांच्या जमातीमध्ये रामनाम लिहिण्यास सुरुवात केली होती. असं सांगण्यात येतं की, एकदा त्यांना मंदिरात जाण्यापासून अडवण्यात आलं. तेव्हापासून त्यांनी असं करण्यास सुरुवात केली.
7 / 7
अन्य एका दाव्यामध्ये सांगण्यात येतं की, आपली जमात हिंदू धर्मापासून दूर असल्याचे पाहून परशुराम यांनी असं केलं होतं. आणखी एका दाव्यात सांगितलं जातं की, रामनामी जमात ही १८९० पूर्वीची आहे. मुघलांनी जेव्हा त्यांना रामापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी आपल्या संपूर्ण शरीरावर श्रीराम लिहिण्यास सुरुवात केली.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याcultureसांस्कृतिकIndiaभारत