'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:53 IST
1 / 7दिल्ली स्फोट प्रकरणात दहशतवादी कटाशी संबंधित डॉक्टर आणि उच्चशिक्षित लोकांची नावे समोर आल्यामुळे, हरियाणातील अल फलाह युनिव्हर्सिटी सध्या तपास यंत्रणांच्या केंद्रस्थानी आली आहे. या युनिव्हर्सिटीचे मालक आणि कुलपती जावेद अहमद सिद्दीकी यांच्या वादग्रस्त भूतकाळाचे धागेदोरे आता मध्य प्रदेशातील महू शहरापर्यंत पोहोचले आहेत.2 / 7जावेद अहमद सिद्दीकी, जो आज एका मोठ्या शैक्षणिक संस्थेचा मालक आहे, त्याचे मूळ ठिकाण महू (इंदूर) येथील आहे. महू शहराचे शहरकाजी असलेले त्यांचे वडील येथेच राहत होते. इंदूरमधील देवी अहिल्या युनिव्हर्सिटीमधून बीटेक पूर्ण केल्यानंतर, जावेदने सुमारे २५ वर्षांपूर्वी महू येथे 'अल फलाह इन्व्हेस्टमेंट' नावाची एक गुंतवणूक कंपनी सुरू केली होती.3 / 7स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, ही कंपनी लोकांना त्यांच्या गुंतवलेले पैसे 'दुप्पट' करण्याचे आमिष दाखवत होती. मात्र, अनेक लोकांचे पैसे बुडल्यानंतर, गुंतवणूकदारांनी दबाव वाढवला. या दबावाला कंटाळून जावेद अहमद सिद्दीकी रातोरात महूमधून गायब झाला. त्यांच्या भावावरही या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.4 / 7महूपासून तब्बल ७००-८०० किलोमीटर दूर असलेल्या फरिदाबाद येथे जावेदने आपले बस्तान हलवले. विशेष म्हणजे, महू येथील फसवणुकीच्या पैशांतूनच त्याने फरिदाबाद येथे १९९७ मध्ये प्रथम एक इंजिनिअरिंग कॉलेज आणि नंतर याच नावाने अल फलाह युनिव्हर्सिटी सुरू केल्याचा आरोप आहे.5 / 7२०१९ मध्ये या युनिव्हर्सिटीला एमबीबीएस वैद्यकीय अभ्यासासाठी मान्यता मिळाली आणि २०२४ मध्ये डॉक्टरांची पहिली बॅच बाहेर पडली. मात्र, आता याच युनिव्हर्सिटीशी संबंधित काही डॉक्टर दिल्ली स्फोटाच्या कटात सामील असल्याच्या संशयावरून ATS च्या ताब्यात आहेत, ज्यामुळे जावेद सिद्दीकी यांचा संदिग्ध प्रवास एका गंभीर वळणावर येऊन ठेपलेला आहे. याबाबतचे वृत्त नवभारत टाईम्सने दिले आहे. 6 / 7अल-फलाह विद्यापीठाचे व्यवस्थापन अल-फलाह चॅरिटेबल ट्रस्टद्वारे केले जाते. विद्यापीठाव्यतिरिक्त, ट्रस्ट अनेक इतर शैक्षणिक संस्था देखील चालवते.7 / 7अल-फलाह स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ब्राउन हिल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अल-फलाह स्कूल ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग, अल-फलाह स्कूल ऑफ फिजिकल अँड मॉलिक्युलर सायन्सेस, अल-फलाह स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट आणि अल-फलाह स्कूल ऑफ पॅरामेडिकल अँड हेल्थ सायन्सेस यांचा समावेश आहे.