शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:46 IST

1 / 5
भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल्वे आहे. तसेच भारतीय रेल्वेच्या मार्गावर हजारो स्टेशन असून, तिथून दररोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. मात्र याच भारतीय रेल्वेकडे असंही एक स्टेशन आहे, ज्याला नावच नाही आहे, हे सांगितल्यास तुम्हाला खरं वाटणार नाही. आश्चर्याची बाब म्हणजे इथे तिकीट खिडकी आहे. तसेच येथून प्रवासी प्रवासही करतात. मात्र या स्टेशनला नाव मात्र नाही आहे.
2 / 5
भारतातील या एकमेव निनावी स्टेशनवरून २००८ पासून गाड्यांची ये जा सुरू आहे. एवढंच नाही तर येथील तिकीट खिडकीवरून प्रवासी तिकीटही खरेदी करतात. मात्र या स्टेशनचं नामकरण मात्र झालेलं नाही.
3 / 5
हे निनावी रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमधील बर्धमान येथून ३५ किमी अंतरावर आहे. तसेच मागच्या १७ वर्षांपासून ते निनावी सुरू आहे.
4 / 5
या रेल्वेस्टेशनला नाव न मिळण्यामागे दोन गावांमधील भांडण हे कारण असल्याचे सांगण्यात येते. जेव्हा भारतीय रेल्वेने हे स्टेशन बांधले तेव्हा त्याचं नाव रैनागर ठेवण्यात आलं होतं. मात्र स्थानिकांनी आक्षेप घेत हे नाव बदलण्यास सांगितले. यावरून वाद वाढून प्रकरण कोर्टात गेले. तेव्हापासून हे स्टेशन निनावी सुरू आहे. येथे स्टेशनच्या नावासाठीचा बोर्ड लागलेला आहे. पण त्यावर कुठलंही नाव लिहिलेलं नाही.
5 / 5
त्यामुळे अनोळखी लोकांना आपण कुठल्या स्टेशनवर आहोत. याबाबत विचारणा करावी लागते. या निनावी स्टेशनवर केवळ बांकुडा-मासाग्राम पॅसेंजर ट्रेन थांबते. तसेच आठवड्यातून सहा दिवस धावणारी ही ट्रेन रविवारी धावत नाही. त्याच्यामागेही अजब कारण आहे. ते म्हणजे रविवारी येशील स्टेशन मास्तरांना तिकीट घेण्यासाठी बर्धमान शहरात जावं लागतं. त्यामुळे रविवारी हे स्टेशन बंद असतं. या स्टेशनला सध्या नाव नसलं तरी येथील तिकिटावर रैनागर हे नाव छापलं जातं.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेwest bengalपश्चिम बंगालJara hatkeजरा हटके