पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची करडी नजर राहणार; केंद्र लवकरच एक्शन घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 13:25 IST
1 / 10देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आता चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी गृह मंत्रालय इस्रोची मदत घेणार आहे. 2 / 10मिळालेल्या माहितीनुसार, या उपग्रह प्रकल्पाला अंतिम रूप देण्यासाठी गृह मंत्रालयाने इस्रो आणि निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 3 / 10हवामानाची अडचण भासणार नाही. इस्रोच्या मदतीने लवकरात लवकर उपग्रह प्रक्षेपित करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. पाहिले तर भारत-चीन सीमेवर खराब रस्ते आणि दळणवळणाच्या चांगल्या सुविधा नसल्यामुळे काहीवेळा सैनिकांना सीमा भागात पोहोचणे कठीण होते. 4 / 10सततच्या खराब हवामानामुळे आणि बर्फवृष्टीमुळे हिवाळ्यात भारत आणि चीनच्या सीमावर्ती भागावर लक्ष ठेवण्यात खूप अडचणी येतात. त्यामुळे इस्त्रोकडून लॉन्च होणाऱ्या उपग्रहामुळे सीमेवर थेट देखरेख ठेवण्यासाठी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना मदत मिळेल. 5 / 10खराब वातावरण आणि बर्फवृटी अशा परिस्थितीत गृह मंत्रालयाने अवकाश प्रकल्पांतर्गत इस्रोच्या मदतीने आपला विशेष उपग्रह प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याद्वारे सीमावर्ती भागात तैनात असलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांना दळणवळणाच्या चांगल्या सुविधा पुरवल्या जातील. 6 / 10त्याच उपग्रहाद्वारे सीमेवर लक्ष ठेवणे शक्य होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाईल, त्यामध्ये अतिशय शक्तिशाली कॅमेरे आणि कम्युनिकेशन सिस्टीम बसवण्यात येणार आहेत, ज्यामुळे सीमेवर लक्ष ठेवणे सोपे होईल.7 / 10आयबी प्रमुख अरविंद कुमार यांच्यासह सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबीचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला इस्रोचे प्रकल्प संचालक एस अरुणन देखील उपस्थित राहणार आहेत. 8 / 10मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये गृहमंत्र्यांनी स्पेस प्रकल्पासाठी एक विशेष टास्क फोर्स तयार केला होता. स्पेस प्रकल्पांतर्गत इस्त्रोच्या मदतीने सीमेवर पाळत ठेवणे शक्य तितक्या लवकर मजबूत करण्यासाठी उपग्रह आणि दळणवळण यंत्रणा मजबूत करणे हा त्याचा उद्देश होता. 9 / 10या बैठकीत गृह मंत्रालय इस्रोला या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यास सांगेल, असं बोललं जात आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने मंगळवारी PSLV-C52 द्वारे पृथ्वीचे निरीक्षण करणारा EOS-04 उपग्रह लॉन्च केला. यासोबतच आणखी दोन छोटे उपग्रहही अवकाशात पाठवण्यात आले आहेत10 / 10EOS-04 हा रडार इमेजिंग उपग्रह आहे. याचा उपयोग पृथ्वीची उच्च दर्जाची छायाचित्रे घेण्यासाठी केला जाईल. हे शेतीचे उच्च रिझोल्यूशन फोटो, जमिनीतील ओलावा, पाण्याची उपलब्धता आणि पूरग्रस्त क्षेत्रांचे नकाशे आणि सर्व परिस्थितीत कॅप्चर करण्यासाठी डिझाइन केले आहे.