लहानपणी वर्तमानपत्रे वाटली, डिलिव्हरी बॉय म्हणूनही केलं काम; न्यायाधीश झालेल्या यासिन यांची प्रेरणादायी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:10 IST
1 / 8एकेकाळी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या यासिनने केरळ न्यायिक सेवा परीक्षा २०२४ मध्ये दुसरे स्थान मिळवून दिवाणी न्यायाधीश होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. हा प्रवास संघर्ष, प्रेरणा आणि निर्धाराने भरलेला होता.2 / 8मोहम्मद यासीन यांचा जन्म केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील पट्टांबी शहरात झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यांच्या कुटुंबाला राज्य सरकारच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत छत मिळाले. मोठा मुलगा असल्याने यासिन यांचे बालपण अनेक जबाबदाऱ्यांनी भरलेले गेले.3 / 8यासीन यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण घेताना वर्तमानपत्र आणि दूध वाटप करण्याचे काम केले. याशिवाय तो अधूनमधून बांधकामाच्या ठिकाणी मजूर आणि पेंटिंगचे काम करत असे. शालेय जीवनात तो वर्गात सरासरीपेक्षा कमी वेळा उपस्थित होता.4 / 8मात्र यासीन यांनी अभ्यास सोडला नाही. बारावीनंतर यासीन यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा केला. डिप्लोमा केल्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये छोटीशी नोकरी केली, पण तेथून परतल्यानंतर त्यांनी लोक प्रशासनात पदवी घेतली.5 / 8इथून यासिन यांच्या मनात कायद्याची आवड निर्माण झाली. त्यांनी विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. केरळच्या कायदा प्रवेश परीक्षेत त्यांनी ४६ वा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्याला एर्नाकुलममधील एका नामांकित सरकारी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.6 / 8अभ्यासासोबतच यासिन यांनी झोमॅटोसाठी डिलिव्हरी बॉय म्हणूनही काम करायला सुरुवात केली. दिवसा कॉलेजचा अभ्यास आणि रात्री डिलिव्हरीचे काम यासिन करत होते. कोविड काळात झोमॅटोचे काम थांबले तेव्हा त्यांनी मुलांना शिकवणी देण्यास सुरुवात केली.7 / 8यासिन यांनी २०२२ मध्ये एलएलबी पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पट्टांबी मुन्सिफ-मजिस्ट्रेट कोर्टात कनिष्ठ वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली. येथे ते ॲडव्होकेट शाह-उल-हमीद यांच्या हाताखाली काम करत होते.8 / 8२०२३ मध्ये, यासिन यांनी केरळ न्यायिक सेवा परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच प्रयत्नात, ते ५८ व्या क्रमांकावर होते. परंतु मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही. पुढच्या प्रयत्नात त्याने या परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला आणि ते दिवाणी न्यायाधीश झाले. २९ वर्षीय यासिन यांना आता लॉ मध्ये मास्टर्स शिकायचे आहे.